Pune : वैष्णवी हगवणे हिने काही दिवसापूर्वीच आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या प्रकरणी संताप व्यक्त करत असताना आरोपीच्या वकिलाने म्हणजेच वैष्णवी हगवणेच्या पतीच्या वकिलाने वैष्णवीच्या चरित्रावर बोट दाखवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्यामुळे छळ केला असे गृहीत धरले जात नाही, असा वेगळाच वाद त्यांनी घातला. वैष्णवी ला आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, तिची सासू लता हगवणे, आणि देव सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळेच त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आली होते.
पोलीस कोठडीमध्ये झाली वाढ
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी वैष्णवी हगवणे हिचा पती शशांक, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तिच्या आत्महत्येनंतर फरार झालेला दिर, सासरा यांना आश्रय दिला म्हणून प्रीतम वीरकुमार पाटील यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. प्रीतम वीरकुमार पाटील यांचे वय 47 असून ती कोगनोळी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथील रहिवासी होते. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे वय 60 राहणार वडगाव मावळ. बंडू लक्ष्मण फाटक वय 55 राहणार लोणावळा. अमोल विजय जाधव वय 35 आणि राहुल दशरथ जाधव वय 45 दोघेही पुसेगाव जिल्हा सातारा येथील रहिवासी होते. तर या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे.
वैष्णवी हगवणेच्या चरित्र्यावर संशय
आरोपीच्या वतीने अँड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. आणि वैष्णवीच्या चारित्र्यावर संशयास्पद गोष्टी बोलत होता. वैष्णवी चे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेंडन्सी सुसाईड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एकदा रॅट पॉयझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्नही तिने केला असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.