Ghibli मुळे तुमची प्रायव्हसी(Privacy) धोक्यात जाऊ शकते, आत्ताच जाणून घ्या(Ghibli disadvantages)

सध्याच्या काळात प्रत्येक जण Ghibli चा वापर करत आहे. Ghibli फोटोज सध्या Trending मध्ये चालू आहेत. Chat Gpt वर Ghibli स्टाईल आर्ट तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा पर्सनल फोटो अपलोड करता. जर असं करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. कारण तुमच्या पर्सनल फोटोज चा मिस युज होऊ शकतो.

तुमच्या मित्र-मैत्रिणींचा पाहून तुम्ही सुद्धा Ghibli फोटो अपलोड करत आहात का? असं करत असाल तर आत्ताच थांबा. तुमचे मित्र मैत्रिणी व तुम्ही फोटो इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप वर शेअर करत असाल तर ते करू नका, कारण तुमच्या फोटोचा आणि पर्सनल डाटा चा गैरवापर केला जाऊ शकतो.तुमच्या प्रायव्हसी संदर्भात ओपन AI च्या जनरेटर बद्दल तज्ञांनी सांगितले आहे की जर तुम्ही तुमचे पर्सनल फोटो अपलोड करून कोणतेही आर्ट बनवत असाल तर AI प्रशिक्षणासाठी तुमचा पर्सनल फोटोमध्ये प्रवेश करू शकतो. आपण नकळतपणे आपल्या फोनमधील नको तो डाटा AI देत आहोत. त्यामुळे तुमचा पर्सनल डाटा जसे की तुमचे फोटोज डॉक्युमेंट्स धोक्यामध्ये येऊ शकतात तुमच्या प्रायव्हसीलाही धोका होऊ शकतो.https://manews24.in/

AI तुमच्या फोन मधून तुमचा डाटा स्वतः घेऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमचे फोटो अपलोड करता तेव्हा यायला तुम्ही परमिशन देता. जेव्हा तुम्ही तुमची फोटो अपलोड करून Ghibli फोटो करण्यासाठी परवानगी देता तेव्हा Ai तुमची फोटो घेऊ शकतो. त्यामुळे आहे तुमचे फोटोज मनसोक्तपणे वापरू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या प्रायव्हसीची काळजी घेऊन फोटो अपलोड करण्यापूर्वी सावधानगिरी बाळगावी. जेणेकरून तुमच्या प्रायव्हसीचा गैरवापर केला जाऊ शकत नाही.
जेव्हा युजर फोटो अपलोड करतात तेव्हा युजरचा त्या फोटोवर नियंत्रण राहत नाही. तुमच्या गोपनीय वस्तूंचा किंवा फोटोचा वापर Ai च्या प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो.

Ghibli फोटोज मुळे तुमच्यासाठी कोणता धोका निर्माण होऊ शकतो? ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया

  • तुमच्या फोटोचा गैरवापर करून कोठेही जोडले जाऊ शकते.
  • तुमचा फोन हॅक होऊ शकतो.
  • तुमचे फोटोज तुमच्या परवानगीशिवाय वापरले जाऊ शकतात.
  • तुमच्या डॉक्युमेंट्स चा गैरवापर करून तुमची ओळख वापरली जाऊ शकते.
  • तुमच्या कागदपत्रांचा(documents)गैरवापर केला जाऊ शकतो

आजकालच्या काळात प्रत्येक जण AI मदतीने विविध गोष्टी करत आहेत. पण त्या गोष्टींचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर होऊ शकतो हे आपल्याला माहीत नसते. आपण अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्या काही गोष्टी प्रायव्हेट राहतील. Ghibli art वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा डाटा व पर्सनल डॉक्युमेंट्स पर्सनल फोटोज घेतले जाऊ शकतात तुमचा फोन हॅक पण होऊ शकतो या गोष्टींची काळजी घेऊनच कोणत्याही इतर गोष्टींचा वापर करावा.

तुम्ही Ghibli AI फोटोज बनवण्याआधी या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी. ज्यामुळे तुमचा डाटा चोरीला जाऊ शकत नाही.

Leave a Comment