Nanded: नांदेड मधील अपघात (accident), ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, आठ जणांचा मृत्यू

Nanded accident : नांदेड शहराजवळ असणाऱ्या आलेगाव शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे.
नांदेड शहराजवळ असणाऱ्या आलेगाव शहरातील धक्कादायक घटना घडलेली आहे. तिथं शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर व्हेरी कोसळल्यामुळे मोठी जीवित हानी झालेली आहे. ट्रॅक्टर मध्ये महिला मजूर होत्या.

नेमका कुठे जात होत्या या महिला(nanded) :

ट्रॅक्टर घेऊन महिला मजूर कामासाठी जात होत्या. त्या हळद काढण्याच्या कामाला निघाल्या असताना, महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. यात अनेकाचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवारात ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मंजूर आलेगाव शिवारात हळद काढायला येत होत्या. ट्रॅक्टर मध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळली आहे.

या घटनेची माहिती मिळताच गावातील व इतर लोक घटनास्थळी पोहोचले. आणि विहिरीमध्ये दोरी सोडली दोरी मार्फत त्यांनी तीन जणांचा जीव वाचवला. गावातील लोकांनी एक पुरुष व दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. पण जवळपास सात ते आठ जण विहिरीत अडकून असल्याची माहिती गावातील लोकांनी दिलेली आहे. हिंगोली आणि नांदेड पोलीस घटनेच्या ठिकाणी आले आहेत. विहिरीत जास्त पाणी जमा झाल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर बुडालेला आहे.

Leave a Comment