डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालेलं आहे. माहितीनुसार दीर्घ आजाराने त्यांच निधन झाल.
‘वादळवाट’ ‘चार दिवस सासूचे’ ‘दामिनी’ यासारख्या मालिका मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे. ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले. या दुःखाच्या बातमीने मराठी सिनेमासृष्टीत दुःखाचं वातावरण पसरलेला आहे.

डॉक्टर विलास उजवणे यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आजार असल्याचे कळाले आहे. ब्रेन स्ट्रोक, हृदयविकारांसंबंधी गेले काही वर्ष ते आजारी होते. त्यांचे आजारपण वाढत होते. आणि आजाराचा इलाज करण्यासाठी काम नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. अशातच त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी व परिवाराने सोशल मीडियावर मदत मागितली होती. लोकांना ही बातमी कळताच. लोकांनी हळहळ व्यक्त केली होती. बरेच जणांनी त्यांना मदतही केली होती.
डॉक्टर विलास उजवणे यांच्या पत्नी उज्वला उजवणे याही अभिनेत्री आहेत. नवऱ्याच्या आजारपण सांभाळत त्यांना जमले तसे त्याही कलाक्षेत्रा त त्यांनी काम केले. डॉक्टर विलास उजवणे यांचे बरेचसे चित्रपट आहेत. आणि मालिका सुद्धा आहेत. दामिनी, वादळवाट अशा अनेक मालिका तसेच चित्रपट त्यांनी केला. मराठी चित्रपटात आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. तर आज त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीत दुःखाचे मोठे डोंगर पसरलेले आहे.
मीरा रोड या ठिकाणी असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात 4 एप्रिल 2025 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आर्थिक मदतीचे आवाहन (डॉ. विलास उजवणे)
डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक चा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांचे आरोग्य जास्तच बिघडले. आणि त्यांना ह्रदयाचा सुद्धा त्रास होऊ लागला. आजारामुळे त्यांची आर्थिक स्थिती पण बिघडू लागली. त्यामुळेच त्यांच्या मित्रांनी 2022 मध्ये मदतीचे आवाहन केले होते.