India Pakistan conflict : India-Pakistan tension 6-7 मे ला भारताने पाकिस्तान वर एअर स्ट्राइक केला होता. त्या एयर स्ट्राइक मुळे राजस्थान सरकार ॲक्शन मोड मध्ये आलेली आहे. गृह विभागाकडून सूचना जारी करण्यात आलेली आहे. ही सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी आहे. पाकिस्तानी हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ग्रह विभागाने हॉस्पिटलमध्ये औषधे आणि ब्लड बँकांमध्ये रक्त तयारच ठेवण्याचे सांगितलेले आहे. आणि ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. हे इतक्यात संपले नसून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आणि अन्नसाठा व्यवस्थित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत.
जयपुर : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक नंतर भारत–पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आणि रोज नवीनच घटना ऐकण्यात/समोर येत आहेत. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान भारताच्या 15 शहरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यात पाकिस्तानला काही यश आले नाही. भारताने पाकिस्तानलाच हाणून पाडलं. त्यानंतरच भारताने पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये जवळपास 50 ड्रोन हल्ले केल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार आणि राजस्थान सरकार देखील सतर्क होऊन तयारीत लागले आहे. राजस्थान सरकारच्या गृह विभागाने एक सूचना जारी केलेली आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तानी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमर्जन्सी मध्ये नेमकी कोणती आणि काय तयारी करायची, त्याबाबतच गाईडलाईन्स जारी करण्यात आलेले आहेत.
गृह विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा तयार ठेवण्यास सांगितले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पाकिस्तानी जर हल्ला केला तर रुग्णालयामध्ये लागणाऱ्या सर्वच वस्तू जसे की औषधे आणि रक्तपेठ्यांमध्ये सर्व रक्तगटाचे रक्त असावे. रक्त व औषधी उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. असे सांगण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची उपस्थिती असायला हवी.(India-Pakistan tension) त्याचबरोबर राहण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे म्हणून निवडलेल्या इमारतींमध्ये साईटची व्यवस्था असावी जर ती नसेल तर जनरेटर ची व्यवस्था असावी, असे गृह मंत्रालयाने आदेशात सांगितलेला आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि सोशल मीडियावर तर तातडीने लक्ष देण्यास सांगितले आहे, कारण देशांमधील महत्त्वाची इन्फॉर्मेशन शत्रू देशापर्यंत पोहोचली नाही पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या विरोधात नागरिकांना भडकवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर लगेचच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.(India-Pakistan tension) आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पुरेसा अन्नसाठा ठेवावा. लोकांनी आवश्यक त्याच गोष्टींचा तातडीने साठा करावा. आणि अनावश्यक गोष्टींचा साठा करू नये, असे आव्हान करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त, पोलीस, महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सीमा वरती जिल्हे जसे की, गंगानगर, बिकानेर, फलोदी, बाडमेर आणि जैसलमेर या जिल्ह्यांमध्ये सैन्य आणि इतर केंद्रीय संस्थांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा. पीएचईडी विभागाने जिल्ह्यांमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.(India-Pakistan tension)
पश्चिम राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. गृह विभागाने सूचना जारी केल्यानंतर, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी कार्यवाही सुरू केली आहे. याविषयी बोलत असताना एका अधिकाऱ्याने असे सांगितले आहे की, “आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करत आहोत. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे.” या परिस्थितीमध्ये नागरिकांनी शांतता आणि संयम राखावे. असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. आणि सोशल मीडियावर पसरत असणाऱ्या अफवा किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. असेही ग्रह विभागाने सांगितले आहे.
जर हल्ला झाला तर भारत–पाक सिनेजवळील गावांमध्ये लोकांना सुरक्षित जाग्यावर पोहोचवण्याची योजना तयारच ठेवावी. आणि जिल्ह्यामधील महत्त्वाच्या ठिकाणांची यादीही तयारच ठेवावी. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. रुग्णालय, वीज प्रकल्प, धार्मिक स्थळे, तेल आणि वायूचे गोदाम यांच्याही सुरक्षेची व्यवस्था करावी. जर कुठे आवश्यकता असेलच तर अग्निशमन दलाला तयारच ठेवावे. आणि वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल mock drill) करावी. सार्वजनिक ठिकाणी सूचना देण्यासाठी लागणारे पब्लिक ऍड्रेस सिस्टम चालू ठेवावे, आणि जिल्ह्यांमध्ये संपर्क यंत्रणा व्यवस्थित ठेवावी.(India-Pakistan tension)
प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले(India-Pakistan tension)
अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी शांतता पाळावी आणि संयम ठेवावे. असे आवाहन करण्यात आली आहे. अशात सोशल मीडियावर प्रत्येक जण काही ना काही पोस्ट करत आहे. पण त्यातील माहिती कितपत खरी आणि कितपत खोटी आहे याची खात्री आधी करून घ्यावी मगच त्यावर विश्वास ठेवावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यावर आणि नागरिकांना भडकवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून योग्य ती शिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपातकालीन परिस्थितीसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.(India-Pakistan tension)
आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि माहितीसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केलेले आहेत. आवश्यकता असतात नागरिकांनी त्या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.