‘Dance of the Hillary’ भारतावर पाकिस्तानचा Cyber Attack चा डाव; वायरस नेमकं काय आहे?

‘Dance of the Hillary’: पाकिस्तानने भारताच्या विरोधात एक नवीनच डाव रचलेला आहे. पाकिस्तान भारतातील नागरिकांचा महत्त्वाचा डाटा चोरण्याचा डाव टाकत आहे त्यात व्हाट्सअप, फेसबुक आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पाकिस्तान भारतीय यावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे. गुप्तचर यंत्रणा ने सायबर हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अननोन गोष्टी जशा की लिंक्स आणि फाइल्स क्लिक न करण्याची आवाहन केले आहे. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला हल्ल्याचे उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून तेथील दहशतवाद्यांची ठिकाणी उध्वस्त करून टाकली आहेत. पाकिस्तानातील प्रमुख असणाऱ्या शहरातील दहशतवादी तळावर अचूकपणे हल्ला करून भारताने चांगलेच उत्तर दिले आहे. या उत्तराचा विरोध करण्यासाठी पाक ने सायबर हल्ल्याची मोहीम हाती घेऊन राबवण्याचे ठरविले आहे.(‘Dance of the Hillary’)

माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर नंतर पाक ने भारतीयांची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि आर्थिक डेटाची निगडित माहिती व्हाट्सअप, फेसबुक, टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्म वरून माहिती चोरणार आहे. आणि चोरी केलेल्या माहितीचा दूर उपयोग करणार आहे. ‘डान्स ऑफ द हिलरी’ नावाचा सायबर वायरस व्हिडिओ, डॉक्युमेंट्स च्या माध्यमातून पसरवला जात आहे. हा व्हायरस मोबाईल किंवा ईमेलवर येऊ शकतो. तुम्ही अज्ञात लिंक वर क्लिक केल्यास हा व्हायरस खूप नुकसानदायक ठरू शकतो. आणि तुम्हाला नको ती नुकसान पोहोचवू शकतो. त्यात तुमचा पर्सनल डाटा जसे की फोटोज, बँक डिटेल चोरीला जाऊ शकतात. त्यात हॅकर्स ना तुमच्या बँक क्रेडेन्शियल सह अनेक पर्सनल गोष्टी मिळू शकतात.

(‘Dance of the Hillary’)डाटा लिक झाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते बरे…?

  • बँकिंग मधून पैसे चोरीला जाऊ शकतात.
  • तुमचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे लिख होऊ शकतात.
  • डिवाइस चा कॅमेरा आणि माईक रिमोट चालू केला जाऊ शकतो.
  • तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो.

जाणून घ्या कोणत्या फाईल्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात?

  • इ एक्स इ फॉरमॅट मध्ये आलेली अज्ञात लिंक.
  • Tasksche.exe नावाची फाइल्स.
  • ‘डान्स ऑफ द हिलरी’ (dance of the Hillary) नावाने कुठलीही फाईल अथवा व्हिडिओ लिंक आल्यास क्लिक करू नका.
  • कुठलीही अज्ञात लिंक वर क्लिक करणे टाळावे.

त्याच दरम्यान, हा व्हायरस कोणत्या प्रकारे तुमच्या फोनमध्ये येऊ शकतो ते जाणून घेऊया, जर तुमच्याकडे स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन असेल तर त्या फोनमध्ये व्हाट्सअप तर असणारच. कारण आजकाल प्रत्येक जण whatsapp वापरतच आहे. फोटोज ची देवाणघेवाण किंवा मेसेजेस आणि चॅटिंग साठी हा व्हाट्सअप जास्त करून वापरला जातो. त्यामुळे जास्तीचे चान्सेस व्हाट्सअप द्वारे लिंक पाठवण्याची आणि व्हाट्सअप द्वारे तुमचा फोन हॅक करण्याचे असू शकतात. आता तुमच्या व्हाट्सअप ला ही लिंक कशी येणार किंवा अज्ञात फाईल कशी येणार ते जाणून घेऊया. (‘Dance of the Hillary’)

तुमच्या व्हाट्सअप ला एखाद्या अन्नोन (unknown) नंबर वरून एखादा मेसेज येईल त्यामध्ये एखादी फोटो असेल, त्यामध्ये असे लिहिलेले असतील की तुम्ही याला ओळखता का किंवा आपण कॉलेजमध्ये असताना किती मज्जा मस्ती करत होतो तुला आठवते का. आपण सहजरीत्या त्या फोटोवर क्लिक करतो पण हे आपल्यासाठी किती घातक ठरू शकते याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. ज्या क्षणी ती फोटो आपल्या फोनमध्ये डाऊनलोड होईल त्याच क्षणी आपली बँक डिटेल्स, आपली पर्सनल डिटेल्स, आपला सर्व प्रकारचा डाटा त्या हॅकर पशी पोहोचेल.

त्याचबरोबर फोन हॅक करण्याची दुसरी पद्धत म्हणजे एखादी लिंक आपल्या व्हाट्सअप ला किंवा मेसेजला येणे. जेव्हा आपण त्या लिंक वर क्लिक करतो तेव्हा आपली सर्व पर्सनल डिटेल्स, बँक डिटेल्स त्या हॅकर पशी पोहोचते. परत अटॅचमेंट फाइल्स द्वारे आपल्या फोनमध्ये वायरस येऊ शकतो. अशा काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शक्यतो कोणत्याही फोटोवर क्लिक करू नये. आणि कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये. कोणतीही अटॅचमेंट फाईल डाऊनलोड करू नये. गुप्तचर यंत्रणेने भारतीयांना अशा अज्ञात फाईल स्वर क्लिक करणे, डॉक्युमेंट्स उघडणे टाळण्याचा सल्ला दिलेला आहे.(‘Dance of the Hillary’)

या सायबर हल्ल्यामागे पाकिस्तानची आयएसआय आणि सायबर विंग असल्याचा संशय भारतीय गुप्तचर संस्थांना आलेला आहे. या सायबर हल्ल्याचा उद्देश्य कोणताही असू शकतो. जसे की भारतात दहशत पसरवणे, लष्करी प्रती हल्ल्यापासून लक्ष विचलित करणे, नागरिकांचा कोणताही पर्सनल डेटा चोरून त्यांना ब्लॅकमेल करणे आणि निष्पाप नागरिकांना भविष्यासाठी लक्ष करणे असू शकतो. आपण अज्ञात फाइल्स फोन मध्ये डाऊनलोड करणे टाळायची आवाहन करण्यात आले आहे.(‘Dance of the Hillary’)

इजराइल मेड ड्रोन ने केली लाहोरची डिफेन्स सिस्टीम ध्वस्त

पाकिस्तानी भारतातील 15 ठिकाणावर हल्ला केलेला आहे. त्या पंधरा ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचा प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने तेथील अटक, चकवाल, लाहोर, गुजरानवाला, मियावाली, रावळपिंडी, बहावलपूर, छोर, आणि कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या मदतीने खूपच भेदक खाल्ले गुरुवारी केले. पाकिस्तानकडून भारतातील शहरावर ड्रोन हल्ले सुरू असताना त्या हल्ल्यांना भारताने चांगल्या प्रकारेच प्रतिउत्तर दिले आहे.(‘Dance of the Hillary’) भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी हड्डे नष्ट केले. आणि पाकिस्तानचे ड्रोन, आणि मिसाइल निष्क्रिय केले.

Leave a Comment