Mumbai news : कोरोना पुन्हा परत येतोय, मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोन रुग्ण दगावले

Mumbai news मुंबईत कोविडमध्ये काहीशी वाढ झालेली आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या मताने, साधारणतः जवळपास एका महिन्यात कोविडशी निगडित असणारी 8 ते 9 प्रकरणे आढळतात. पण सध्या काही दिवसांमध्ये हवामान बदलामुळे यामध्ये थोडी वाढ झालेली दिसून येत आहे.

कोविड न्यूज : कोविड मुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता. 2019 आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हा कोविड पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसून येत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, केईएम रुग्णालयात दोन मृत्यूची नोंद झालेली आहे. या दोन्हीही रुग्णांची कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. पण रुग्णालयातील प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे की त्यातील एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झालेला आहे. आणि त्यातील दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू किडनीच्या आजाराने झालेला आहे. तरीही डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी योग्य ती तपासणी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना घाबरू नये असे आवाहनही केले आहे.

रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्र मृत्यूचे कारण कोविड नाही

Mumbai news : रुग्णांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्यू पत्रात मृत्यूचे कारण कोविडच आहे असे दिलेले नाही. पण त्यानंतर सर्वांना असा प्रश्न पडतो की जर मृत्यूचे कारण कोविड नसेल तर कोविड चाचणी का करण्यात आली असेल? दुसऱ्या एका घटनेत, एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, जी आधीपासूनच किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. आणि त्या मुलीचा कोविड टेस्ट करताच असे समजले की ती कोविड पॉझिटिव्ह आहे. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन देसाई यांनी सांगितले की, दोन्हीही रुग्णांच्या मृत्यूचे कारण कोविड नसून इतर गंभीर आजार होते.

आणि कोणीही घाबरू नये. आणि यासंदर्भात सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासन आज देणार आहे. बीएमसी च्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शाह असे म्हणाल्या की, कोणत्याही नागरिकांनी घाबरू नये. आम्ही कोविड वर आणि कोविड प्रकरणावर योग्यरीत्या लक्षात ठेवत आहोत. हवामान बदलत असल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मे महिन्यामध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये थोडी वाढ झाली आहे, परंतु रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. असे त्या सांगत होत्या.(Mumbai news)

कोविड प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार

केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या परळ येथील 59 वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाने कुटुंबाला देण्यास सरळ नकार दिला. त्या महिलेला कर्करोग होता. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. मनाली की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. अशा परिस्थितीमध्ये, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार महिलेच्या मृतदेहाला कुटुंबाला देण्यास नकार दिला. याविषयी रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉल नुसार कुटुंबातील कोणत्याही फक्त दोन सदस्यांसोबत भोईवाडा स्मशानभूमीत त्या स्त्रीचे अंत्यसंस्कार करण्यात आले.(Mumbai news)

READ THESE

Terror Attack: ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्ब ने उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना मिळाला ई-मेल

Leave a Comment