Monsoon काही दिवसातच असणार महाराष्ट्राच्या वेशीवर, आता कोठे आहे मोसमी वारे?

Mansun 2025 : मे महिना संपत आलेला आहे. तर या मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असतानाच आता या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. मोसमी पावसाच्या निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काही दिवसाआधीच अंदमान आणि निकोबार बेट समूहावर सुरुवात झाली होती. आणि पाहता पाहता या वाऱ्यांनी अतिशय चांगला वेग धरला आहे. आणि त्याच वेगाने पुढील टप्प्याच्या रोखाणं प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळेच यावर्षी केरळात आणि पर्यायी महाराष्ट्रातही मान्सून तुलनेने निर्धारित वेळेच्या आधीच पोहोचण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसून येत आहे.

केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार Monsoon च्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार जून ते सप्टेंबर पर्यंत सामान्य पेक्षाही जास्त पर्जन्यमान पाहायला मिळेल. प्रत्यक्षात मान्सून सामान्य स्तरावर राहण्यासाठी उत्तर आणि पश्चिम भारतात हीट लो म्हणजे उष्णतेमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून मधील बाष्प शोषला जातो. पण सध्या अशी कोणतीही स्थिती तयार झालेली किंवा होताना दिसत नाही. असं हवामान विभागातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे बदलणारी हवामान प्रणाली मान्सूनचा मुक्काम वाढवणार की काय… हे पाहणं अधिकच महत्त्वाचे ठरेल.

हवामान विभाग

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकलेले असून, अरबी समुद्रा सोबतच कोमोरीन क्षेत्र आणि श्रीलंकेतील काही भाग या वाऱ्याने व्यापलेला आहे. तर तिथं बंगालच्या उपसागरातही वाऱ्याने समाधानकारक वेग घेतला आहे. 13 मे रोजी बंगालचा उपसागरासह अंदमान निकोबार इथं दाखल झालेल्या या मान्सूनच्या वाऱ्याने 17 मे पर्यंत संपूर्ण अंदमान आणि निकोबार व्यापून घेतला आणि श्रीलंकेचा भागही व्यापक या मान्सून कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील सागरी हद्दीत प्रवेश केलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून मालदीवला पूर्णपणे व्यापून घेत दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पुढचा प्रवास सुरू करणार आहे. सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता दिसत असल्यानं पुढील काही दिवसात देशाच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात म्हणजेच कर्नाटक, कोकण आणि गोवा भागामध्ये अत्यंत जोरदार ते मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच आता केरळमध्ये Monsoon 27 मी आणि त्यानंतर एक ते पाच जून दरम्यान तो महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment