Deepika Kakkar : टीव्ही अभिनेत्री असलेली दीपिका कक्कर हिला कर्करोग असल्याचे सर्वांना कळाले आहे. दीपिकाला स्टेज दोन चा कर्करोग झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम वर पोस्ट करत दिलेली आहे. ती तिच्या कर्करोगाबाबत सोशल मीडियावर क्लियर सांगत असल्याचे दिसून आले आहे. आणि ती तिच्या चाहत्यांना आवाहन करत होती की, तुम्हीही देवाकडे प्रार्थना करा. दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी काही दिवसाखालीच एक व्लॉग बनवला. त्यामध्ये दीपिका आणि शोएब तिच्या नाजूक तब्येतीबद्दल सांगत होते.
अभिनेत्रीला लिव्हर मध्ये ट्यूमर आहे
ते दोघे म्हणत होती की, अभिनेत्रीला लिव्हर मध्ये ट्यूमर आहे. दीपिका कक्कर ने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले होते की, ‘तुम्हाला माहिती असेलच गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप कठीण गेले आहेत. कारण पोटाच्या वरच्या भागात सतत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये जावं लागले. तेव्हा समजले की पोटाच्या वरच्या भागांमध्ये सतत दुखत असल्याचे कारण काय होते. लिव्हर मध्ये टेनिस बॉल च्या आकाराचा ट्यूमर आहे.

आणि चाचणीनंतर कळलं की ट्यूमर दुसऱ्या स्टेजचा कर्करोग आहे. ‘दीपिका कक्कर ने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हा आतापर्यंतचा आमच्यासाठीचा सर्वात कठीण काळ आहे. पण मी पूर्णपणे सकारात्मक आहे. या परिस्थितीचा सामना मला ठामपणे करायचा आहे. आणि यातून मी लवकरात लवकर बाहेर पडणार आहे. माझे पूर्ण कुटुंब माझ्या सोबतच आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि प्रार्थना माझ्यासोबत आहेत. लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडेल, असं दीपिका कक्कर ने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं.
दीपिका कक्कर ने अनेक सिरीयल्स मध्ये काम केलेला आहे. मेन म्हणजे ससुराल सिमर का या सिरीयल मधून घराघरात पोहोचणारी ही अभिनेत्री आहे. ससुराल सिमर का या सिरीयल पासून तिला अधिकच नियम आणि फेम मिळालं होतं. दीपिका कक्करच्या आजारपणाबद्दल ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे. असंच, लवकर बरं होण्याची प्रार्थनाही केली आहे. ससुराल सिमर का या मालिकेत भूमिका करणारी अविका गौर तिने सुद्धा तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, तू लवकरच ठीक होशील, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. त्याबरोबरच जयती भाटिया हेने सुद्धा कमेंट केली आहे की, तू हिम्मत हारू नकोस, तू खूप बहादुर मुलगी आहेस.
शोएब इब्राहिम ने दीपिका कक्कर च्या हेल्थ बाबत अपडेट दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, अभिनेत्रीची पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याने एक पोस्ट करत म्हटलं आहे की, दीपिकाचे हेल्थ अपडेट देतोय. तिची ताप आता कमी आहे. तिला आता घरी आणण्यात आले आहे. आणि जर सगळं काही नियंत्रणात राहिल तर ठरविल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात तिच्यावर शस्त्रक्रिया होईल. कृपया तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. त्याबरोबरच, त्याने असे म्हटले आहे की, सभा आणि खालील हे पालक झाले आहेत. त्यांच्या बाळाला आणि सबाला देखील तुमचा भरभरून आशीर्वाद द्या. आणि दीपिका साठी ती लवकर बरी होईल अशी प्रार्थना करा.