‘धडक 2’ ; सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा अंगावर शहारे आणणारा चित्रपट

धडक मूवी तर ही सर्वांनी पाहिलीच असेल. ईशान कट्टर आणि जानवी कपूर या दोघांनी धडक मूवी मध्ये दमदार असा अभिनय केला होता. आणि ती मूवी सक्सेसफुल पण ठरली होती.

‘धडक 2’ या सिनेमातील गेल्या अनेक दिवसापासून जोरातच चर्चा चालू होती. “एक था राजा, एक थी रानी” च्या टॅग लाईनच्या अंतर्गत ‘धडक टू’ ची घोषणा करण्यात आली होती. या मूवी मध्ये लीड रोल म्हणून सिद्धांत चतुर्वेदी मेन हिरो चा रोल निभावताना दिसत आहेत. आणि तृप्ती डिमरी या अभिनेत्रीने हीरोइन चा लीड रोल निभावला आहे. या दोन्ही कलाकारांची मूव्हीमध्ये प्रमुख भूमिका होती. आणि काही दिवसांपूर्वीच ‘धडक 2’ चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जात व्यवस्थेचा भीषण वास्तव समोर आलेलं आहे. हा ट्रेलर फक्त तीन मिनिटांचा असून अंगावर शहारे आणून सोडण्याजोगा आहे.

‘धडक 2’ ट्रेलर

‘धडक टू’ सिनेमा अत्यंत उत्कृष्टरित्या सर्वांसमोर दाखवण्यात येणार आहे. सिनेमाचं ट्रेलरच अंगावर शहारे आणण्यासारखा आहे. सिनेमात असं दिसतं की, तृप्ती आणि सिद्धांत एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. कॉलेजमध्ये सिद्धांत एक शांत स्वभावाचा मुलगा दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्वजण सिद्धांत वर हसतात आणि त्याची खिल्ली ओरडतात. पण तृप्ती त्याला सपोर्ट करत असते. दोघांची चांगली मैत्री होते. त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलते हे त्यांना समजत नाही. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन जातं. पण या प्रेमाला जातीचं ग्रहण लागतं.

सिद्धांत आणि तृप्तीचं इंटरकास्ट प्रेम प्रकरण अत्यंत अवघड असल्याचं दिसतं. सिद्धांत आणि तृप्तीचे प्रेम सगळ्यांसमोर येतात त्या दोघांनाही अत्यंत कठीण परिस्थिती ला समोर जावं लागतं. त्यांना खूप त्रास सहन करायला लागतो त्याचबरोबर सिद्धांच्या कुटुंबीयांनाही तोच त्रास सहन करावा लागतो. मारहाण सहन करावी लागते. ट्रेलर चा शेवटचा भाग अत्यंत दुखद आहे. आणि तो सीन अंगावर काटे उभा करणार आहे. लीड रोल ला म्हणजे सिद्धांत ला साखळीने रेल्वे पटरीवर बांधलं जातं. त्यात समोरून एक ट्रेन येताना दाखवण्यात आली आहे.

तो सीन पाहून कदाचित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतीलच. आणि त्याचबरोबर अंगावर शहारे सुद्धा येतील. अत्यंत सुंदर रित्या जातिभेद यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. हा मूवी प्रत्येकाला वेड लावण्या जोगी आहे.

‘धडक 2’ सिनेमा घरात कधी येणार ?

‘धडक 2’ हा सिनेमा एक ऑगस्टला रिलीज होणार आहे. धर्मा प्रोडक्शन, करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. मूवी चा ट्रेलर पाहूनच सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहत आहेत. प्रेक्षकांना ट्रेलर अतिशय आवडल्याचे दिसून येत आहे. मूवी चा ट्रेलर तर भन्नाट आहे पण मुव्ही सुद्धा अशीच भन्नाट असेल असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या मूवी मध्ये तृप्ती आणि सिद्धांत प्रथमच एकत्र दिसून आले आहेत. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, धडक या मूवी मध्ये सर्वात आधी जानवी आणि ईशान या दोघांनी भूमिका निभावली होती.

ती मूवी एका मराठी चित्रपटाचा रिमेक होता. नागराज मंजुळे यांनी प्रथमच सैराट ही मूवी सर्वांसमोर आणली होती. त्या मूवीचा हिंदी रीमेक धडक ही मूवी होती. ‘धडक 2’ मध्ये अनेक फेमस कलाकार पाहायला मिळणार आहेत. ही मूवी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.

also read these

रस प्यायला ये म्हणलं माय : सचिन कुमावत आणि मोगरा पवार यांचा Adorable व्हिडिओ सॉंग

Leave a Comment