Microsoft : AI ची सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ए आय मुळे अनेक कामे सोपी झालेली आहेत. प्रत्येक जण ए आय च्या मदतीने आपली कामे पूर्ण करत होते. आणि त्यामुळे अनेकांची फारशी मदतही होत होती. पण यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
Microsoft : सध्या बघा व तिकडे ए आय ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण एआय वापरत आहे. आपल्या कामांमध्ये असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये यायच्या मदतीने अनेक कामे सोपी झाली आहेत. पण या एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यामध्ये (maicrosoft) मायक्रोसॉफ्ट ने असे सांगितले होते की 6000 जणांना कमी करण्यात आले आहे. आणि 6000 जणांना कमी केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर अभियंते बळी ठरले. एका अहवालानुसार, वॉशिंग्टन मधील कर्मचाऱ्यांच्या लिस्टमध्ये. ज्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आली होते त्यामध्ये 40% कर्मचारी हे सॉफ्टवेअर अभियंते होते.
काही महिन्यापूर्वीच सॉफ्टवेअर कंपनीने या अभियंत्यांना एआय टूल्सचा वापर करणे वाढवण्यास सांगितले होते. आणि त्यामध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या काही अभियंत्याचाही समावेश आहे. कंपनीने त्यांना खेळायला जास्तीत जास्त वापरात आणण्यासाठी सांगितले होते. आणि एआय वरील अवलंबत्व वाढवण्यास सांगितले होते. त्यानंतर, या यामुळे त्या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली.
ज्युनियर आणि सीनियर इंजिनियर ना काढण्यात आले
यामध्ये काही ज्युनियर आणि सीनियर इंजिनियर यांची कपात करण्यात आली आहे. इंजिनीयर यांची कपात केल्यामुळे. काही दिवसातच याचा परिणाम फक्त कोडर स्वरच नाही तर इतर विभागांवरही झाला आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात चांगली कमाई असूनही कंपनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे.
AI वापरण्याचा सल्ला
जेफ हुल्से हे मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष आहेत. जेफ हुल्से यांनी त्यांच्या टीमला पन्नास टक्के कोड जनरेट करण्यासाठी ओपन ए आय पॉवर्ड चॅटडॉट वापरण्यात सांगितले होते. एकूण त्यांच्या टीम मध्ये 400 कर्मचारी होते. कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कमी केले. पण ज्यावेळी कंपनीने कर्मचारी कमी केले त्यावेळी यामध्ये सर्वात जास्त एआय वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे आय वापरणाऱ्यांना सर्वात जास्त मोठा झटका बसला.
त्याच दरम्यान, आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या रिप्लेसमेंट साठी यायला ट्रेनिंग दिलेली आहे का? असे प्रश्न सर्वांसमोर येत आहेत. मायक्रोसॉफ्टचे असणारे सीईओ सत्या नाडेला हे नेहमीच एआय बाबत उघडपणे बोलत असतात. अनेक प्रकल्पांमध्ये हे ए आय जवळपास दोन तृतीयांश कोड लिहीत आहे, असं त्यांनी स्वतः कबूल केला आहे. या बदलामुळे आता नोकरी करणाऱ्यांसमोर मोठं आवाहन आहे.
कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या लिस्टमध्ये फक्त ज्युनियर कोडरपूर्ती मर्यादा नसून तिथे उत्पादन व्यवस्थापन आणि तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापन यासारख्या कामे करणाऱ्यांनाही याचा मोठा धक्का बसला आहे. या मागचे कारण काय असू शकते हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे पण एआय वर अवलंबून राहणे हे यामागचे मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे.