Corona virus : देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले आहेत हे रुग्ण?

Corona virus : कोरोना वायरस हा आधी पण आपल्या देशात आला होता. या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशामध्ये हाहाकार पसरला होता. कित्येकांचा जीवही गेला. आता परत हा कोरोना व्हायरस आपल्या देशात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाचे पुन्हा एकदा टेन्शन वाढला आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 याची एन्ट्री झाली आहे. सध्या तामिळनाडू आणि गुजरात येथे नवीनच व्हेरिएंट आढळून आले आहेत. INSACOG च्या डेटामध्ये याबाबत खुलासा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत.

या कोरोना व्हायरसचे नवीन दोन प्रकारचे सब व्हेरिएंट आहेत. त्यामध्ये NB.1.8.1 आणि LF.7 हे आहेत. इंडियन SARS -COV-2 जीनोमिक्स कन्सोरटीएम (INSACOG) च्या अनुसार एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक रुग्ण आढळला आहे. इतकेच नव्हे तर गुजरात मध्ये मे महिन्यात LF.7 चे चार रुग्ण आढळून आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) NB.1.8.1 आणि LF.7 ला व्हेरीएंट्स अंडर मॉनिटरिंग (variant under monitoring) या कॅटेगिरी मध्येच ठेवला आहे. हे variants of concern किंवा variants of interest नाही. पण आशिया आणि चीन मधील काही भागांमध्ये कोरोना प्रकरणाच्या वाढीसाठी हे व्हेरियंट जबाबदार आहे असं मानलं जात आहे. INSACOG याच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतात सर्वात प्रचलित व्हेरियंट JN.1 आहे. ज्याची चाचणी केल्या असता सर्व नमुन्यांपेक्षा 53% आहे. त्यानंतरच BA.2 (26%) आहे. आणि इतर ओमायक्रोन सबवेरीएंट्स (20%) आहेत.(Corona virus)

तज्ञांची बैठक (Corona virus)

आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक ठेवण्यात आली. बैठकी दरम्यान ICMR, NCDC आणि इतर आरोग्य संस्थांमधील तज्ञांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर सध्या तरी कोणताही मोठा धक्का नसल्याचं दिसून आलेल आहे. परंतु सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आली आहे. आणि प्रत्येकाने योग्यरीत्या सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे.

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या राज्यांमधून काही कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे सांगितले आहे. देशात कोरोना व्हायरस वाढत आहे आणि त्याबरोबरच श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्यासाठी आयडीएसपी IDSP (integrated disease surveillance program- इंटिग्रेटेड डिसीज सर्वलेन्स प्रोग्राम) आणि ICMR च सेंटरिया आहे. बरेच असे प्रकरण सौम्य आहेत आणि रुग्णांवर घरीच उपाय सुरू आहेत. सध्या तर कोणताही मोठा धक्का दिसून येत नाही.(Corona virus)

तज्ञ नेमकं काय म्हणतात?

NB.1.8.1 च्या स्पाईक प्रोटीन मध्ये आढळणारी A435S, V445H आणि T478I यासारखे न्युटेशन त्याच्या वेगाने पसरण्याची आणि रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचवण्याची क्षमता दर्शवत असतात. WHO च्या प्राथमिक जोखीम मूल्यांकन अहवालानुसार, या (variant) व्हेरियंट मुळे सध्या जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याला असणारा धोका कमी प्रमाणात आहे.

Leave a Comment