पाकिस्तान एवढा पैसा नेमकं आणतो कुठून ; सैन्याचे उद्योगधंदे जाणून व्हाल थक्क!

पाक ची आर्थिक स्थिती सध्या वाईट असतानाही, हे एवढा पैसा नेमका आणतो तरी कुठून. लढाऊ विमाने, पाणबुड्या, ड्रोन आणि युद्धनौका पाकिस्तान खरेदी करत असतो…

पाक एवढा पैसा नेमकं आणतो कुठून : भारत आणि पाक यांच्यात अखेर युद्ध संपली अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या युद्धाला पूर्णविराम शेवटी लागलाच. जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढला होता. आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी युद्ध ही झाले. त्यामध्ये भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केले. त्यानंतरच, पाकने सुद्धा ड्रोन आणि मिसाइलच्या साह्याने हल्ले केले होते. पण भारताने ते हवेतल्या हवेतच नष्ट करून टाकले. पाक ने पाठवलेले ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट होऊन गेले. एवढेच नव्हे तर भारताने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीमही उध्वस्त करून टाकली होती.

त्यामुळे आता सर्वांसमोर हा प्रश्न येऊन उभा राहिला आहे की, एवढ्या कर्जात बुडालेल्या पाकला अखेर पैसा पुरवठा कोठून होतो. आणि लष्करी ड्रोन, लढाऊ विमाने, इत्यादी खरेदी करण्यासाठी पैसा नेमका येतो कुठून? पाकची स्थिती वाईट असल्याने सर्वांना आता असा प्रश्न पडला आहे की, लढाईसाठी लागणारे साहित्य पाकिस्तानकडे नेमके येथे तरी कुठून. पाक ची आर्थिक स्थिती वाईट असतानाही, ते लढाऊ विमाने, पाणबुड्या, ड्रोन इत्यादी खरेदी करत असतो. तो खरेदी करतो तरी कसा आणि पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 236 अब्ज डॉलर एवढा आहे. त्याचबरोबर या वर्षात ते केवळ संरक्षणासाठी सात अब्ज डॉलर्स पेक्षाही अधिक खर्च करण्याची योजना आखत आहे.

सैन्याजवळ पैसा नेमका येतो कुठून?

खरेदीच्या संदर्भात पाहता पाकचे नियम थोडेसे वेगळे आहेत. चीन पाकला 80% हून अधिक शस्त्रास्त्रे पुरवतो. चीन केवळ शस्त्रास्त्रेच पुरवत नाही, तर तो ती खरेदी करण्यासाठी पैसाही पाकिस्तानला देत असतो. हा पैसा चीन कमी व्याजदराने, आणि सोप्या अटीवर आणि दीर्घ कालावधीसाठी देत असतो. त्याचबरोबर, पाक सैन्याची स्वतःची एक मोठे व्यावसायिक साम्राज्यही आहे. पाकिस्तानी लष्कर सिमेंट कारखाने, इन्व्हेस्टमेंट काउंसिल, शेती, आणि गृहनिर्माण प्रकल्प अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कार्य करत असतो. यामुळेच पाकिस्तानी सैन्य सरकारी बजेटवर अवलंबून राहत नाही. तेथील सैन्य स्वतः पैसे कमावतो आणि स्वतःच खर्च करतो. आणि लागणारे शस्त्र यांची खरेदी ही करत असतो.

अनेक देशाकडून घेतले आहे कर्ज :

माहितीनुसार पाकिस्तानी अनेक देशांकडून कर्ज घेतलेल्या आहे. सगळ्यात जास्त म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला कर्ज दिले आहे. कारण 1948 पासून पाकला अमेरिका कर्ज देत आहे. 40 अब्ज डॉलर्स ची आर्थिक आणि लष्करी मदत अमेरिकेने पाकला केलेली आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटन कॅनडा आणि युरोपचा विचार करत असता हा आकडा 55 अब्ज डॉलर होऊन अधिकच दिसून येतो. दोन दिवसांपूर्वीच पाकला आयएमएफ ने 2.4 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. त्याचबरोबर इएफएफ अंतर्गत एक अब्ज डॉलर आणि 1.4 अब्ज डॉलर्स आरएसएफ अंतर्गत देण्यात आलेले आहे. हवामान बदलाचा सामना करणे हे आरएसएफ चे उद्दिष्ट आहे. इएफएफ चे उद्दिष्ट पाकचे अर्थव्यवस्था स्थिर करणे आहे. हे सात अब्ज डॉलरच्या पॅकेजचा एक भाग आहे जो 37 महिने चालेल.

Leave a Comment