प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे सतत स्वप्न पाहत असतो. श्रीमंत असतो वा गरीब असो प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार तर असतोच. तर त्या स्वप्नातील एक ड्रीम कार म्हणजे McLaren 750S
स्वप्नातल्या दुनियेतून जेव्हा एखादी गोष्ट प्रत्यक्षात उतरते तेव्हा आपले हृदय मात्र उल्हास आणि भरून येत असते. आणि तसेच जेव्हा आपल्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आपल्यासमोर येत असते तेव्हा आपला आनंद जणू गगनात मावेनासा होत असतो. काही अशाच भावना जोडलेल्या आहेत McLaren 750S च्या नवीन पेशकश मध्ये. ही कार 12 जानेवारी 2024 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. ह्या सुपर कार ची किंमत 5.91 करोड इतकी आहे. या कारमध्ये आपल्याला वेग, लक्झरी आणि परफॉर्मन्स चा परफेक्ट मिळ पाहायला मिळतो.
McLaren 750S ची डिझाईन, सुंदरता आणि aerodynamics च अनोख संगम
McLaren 750S ला पाहून पहिल्या नजरेतच आपल्याला 720S ची आठवण नक्की येणारच, आणि जसं जसं तुम्ही या कारला हाताळत जाता, आणि जवळून पाहता तुम्हाला तिच्या बाबतीत ची प्रत्येक गोष्ट आवडायला लागेल.
समोरच्या ठिकाणी नवीन आणि बंपर असणारी, शार्प अशी LED आणि त्याचबरोबर हेडलॅम्प्स सोबत DRLs, आणि मोठा स्प्लिटर तिच्या ॲग्रेसिव्ह असणाऱ्या अशा या स्टाईलला दर्शविते. इतकेच नव्हे तर पाठीमागच्या साईटला एक मोठा असा ऍक्टिव्ह रियर विंग आणि एक्सटेंडेड डेक हिला परफॉर्मन्स आणि लुक दोन्ही मध्येही एकदम दमदार अशी बनवतात.
परफॉर्मन्स अशी जी तुमच्या हृदयाचे ठोके वाढवेल 2.8 सेकंदात 100 kmph
McLaren 750S मध्ये दिलेल्या 4.0 लिटर ट्विंन–टरबो V8 इंजन 740bph ची पावर आणि 800nm टॉर्क जनरेट करत असतो. हा 7 स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्सच्या सोबत येतो. आणि 0 ते 100 kmph च्या वेगाने सहज 2.8 सेकंदामध्ये पकडतो. ह्याचे टॉप स्पीड 331 kmph इतकी आहे. जे ह्याला McLaren ची आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त ताकतवर रोड–लीगल कार बनविते. या व्यतिरिक्त ही 720S पेक्षा 30 किलोने हलकी पण आहे. ज्यामुळेच तिची हॅण्डलिंग अजून इतकी उत्तम झालेली आहे.
इंटरियर मध्ये लक्झरी सुद्धा
या कारचा केबिन एक अशी जागा आहे जिथे परफॉर्मन्स च्या बरोबरच लक्झरी चा मेळ सुद्धा मिळतच असतो. कार मधील पूर्ण डॅशबोर्ड आणि सीट प्रीमियम नप्पा लेदर ने झाकलेली आहेत. त्याच्याबरोबरच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वर्टीकली plasted 8 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, वायरलेस Apple carplay, आणि Android auto यासारखे अनेक स्पेशलिटी या कारला परफेक्ट बनवते. Bowers and wilkins चा हार्ड एन्ड साऊंड सिस्टम या कारमध्ये म्युझिक ला अत्यंत रॉयल बनवते. आणि म्युझिक ऐकायलाही अत्यंत सुखद अनुभव मिळतो.
McLaren 750S ची कॉम्पिटिटर Ferrari 296GTB सोबत मुकाबला
या सेगमेंटमध्ये McLaren 750S चा सरळ मुकाबला Ferrari 296GTB सारख्या हाय परफॉर्मन्स सुपर कार सोबत होतो. पण, आपला स्टाईल, टेक्नॉलॉजी आणि वेगांसोबतच 750S ही एक अत्यंत खास आणि युनिक चॉईस बनवते.
सेफ्टी फीचर्स आणि टेस्टिंग
McLaren 750S ने आतापर्यंत कोणत्याही NCAP क्रॅश टेस्टिंग मध्ये हिस्सा घेतलेला नाही. पण तीची बिल्ड क्वालिटी आणि टेक्नॉलॉजी तिला सुरक्षित असल्याचे दाखवून देण्यात सक्षम आहे.
Tip : वरील दिलेली सर्व माहिती पब्लिक सोर्सेस आणि ऑफिशियल डिटेल्स वर आधारित आहे. कृपया कोणतीही कार खरेदी करत असताना त्याबद्दल सर्वात आधी पूर्ण माहिती काढा मगच खरेदी करा.