Operation sindoor : पाकिस्तानातील उध्वस्त झालेली ठिकाने सॅटलाइट फोटो द्वारे आले समोर

लष्करात द्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार 6–7 मे च्या मध्यरात्री 1 ते 1:30 च्या सुमारास 25 मिनिटांमध्ये दहशतवाद्यांच्या 9 लक्षावर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 21 ठिकाण उध्वस्त करण्यात आली.

Operation sindoor : जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला भारताने घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर करत असताना 6–7 मे रोजी अर्ध्या रात्री पाकिस्तानात जवळपास 100 किमी आत जाऊन दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ला करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले. भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याचा प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराने हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातले नऊ दहशतवादी अंडे पूर्णपणे उध्वस्त केले आहेत. त्यामध्ये जयश–ए–मोहम्मद आणि लष्कर–ए–तोयबा यांचा दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा समावेश आहे. भारतातील तिन्ही दलांनी हे ऑपरेशन सिंदूर पार पडलं. भारताने आपली ताकद पाकिस्तानाला दाखवून दिली आहे. पाकिस्तानात झालेल्या विध्वंसाचे सॅटलाईट द्वारे फोटो समोर आले आहेत. बहावलपूर, मुरीदके आम्ही इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची सॅटॅलाइट फोटो शेअर करण्यात आले आहे. हे फोटो ANI यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Operation sindoor).

सॅटलाइट द्वारे घेण्यात आलेल्या या फोटोंच्या माध्यमातून विधवांसाचा अंदाज आपण लावू शकतो. पाकिस्तानातल्या पंजाब मधील भावपूर्ण हे जयेश ए मोहब्बत आणि लष्कर ए तोयबा गड आहेत.(Operation sindoor) भारताने या दोन्ही संघटनांना उध्वस्त करून टाकले आहे.


भारताने नेमक कोणकोणत्या ठिकाणी हल्ला केला (Operation sindoor) :

  1. बहावलपूर– आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 की मी आत आहे. जैश–ए–मोहम्मद (JEM) यास दहशतवादी संघटनेच मुख्यालय आहे.
  2. गुलुपूर – नियंत्रणरेषेपासून(LOC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात आहे 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ मधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथे आहेत.
  3. मुरीदके– सीमेलगत, सांबा समोर सुमारे 30 किमी वर लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा तळ आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच जागून ट्रेनिंग घेऊन आले होते.
  4. सवाई LeT कॅम्प – PoJK मधील टंगदार सेक्टर मधील, 30 किमी आत मध्ये आहे. सोनमर्ग मध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्ग मध्ये 24 ऑक्टोबर 2024 पहलगाम मध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यांच्या संबंधामुळे इथे हल्ला करण्यात आला.
  5. कोटली Let कॅम्प – नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर आत असलेले, आणि राजुरी समोर आहे. LeT चा आत्मघात की तळ असून सुमारे 50 दहशतवाद्यांची क्षमता आहे.
  6. बिलाल कॅम्प– जैश-ए-मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे.
  7. सर्जन कॅम्प – JeM चा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून आठ किमी आत सांबा–कठुआ समोर हा कॅम्प आहे.
  8. बर्नाळा कॅम्प – नियंत्रण रेषेपासून दहा किमी आत सजवरी समोर आहे.
  9. मेहमुना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत, सियालकोट जवळ हे ठिकाण आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प आहे.(Operation sindoor)

मॅक्स आर टेक्नॉलॉजीच्या मदतीने बहालपूर आणि मुरीद के शहरांमध्ये झालेल्या विध्वंसाचे फोटो घेण्यात आलेले आहेत. या फोटोमध्ये हल्ल्यापूर्वी आणि नंतर बहावलपूर मधील जामिया मशिदीचे आणि पाकिस्तान मध्ये मुरीदके चे झालेले नुकसान दिसून येत आहेत.


Leave a Comment