Waves Summit 2025 : अमृता खानविलकर waves summit मध्ये गेलेली असता, तेथे 'थलायवा' सोबत तिने फोटो शेअर केला.
Waves Summit 2025 : अमृता खानविलकर Waves Summit मध्ये पोचली. आणि तिने ‘थलायवा’ सोबत फोटो शेअर केला. भारताच्या पहिल्या ‘ जागतिक ऑडिओ–व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (vaves) शिखर परिषदेचं आयोजन आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी या परिषदेसाठी आज हजर झालेली होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना संबोधितही केलं. या परिषदेसाठी मराठी फिल्म इंडस्ट्री ची एक्टरेस अमृता खानविलकर पण उपस्थित होती. तिथे रजनीकांत पण उपस्थित होते. रजनीकांत यांना भेटल्याचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट मार्फत शेअर केलेला आहे.
एक ते चार मे पर्यंत ‘Waves’ ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. आज या परिषदेचा पहिला दिवस होता, त्यामुळे या परिषदेत सिनेमा सृष्टीतील रणवीर कपूर, रजनीकांत, दीपिका पादुकोण इत्यादी फिल्मस्टार तेथे उपस्थित होते. अमृता खानविलकर हिने ‘थलायवा’ रजनीकांत यांच्यासोबत इंस्टाग्राम वर एक पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, ‘आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा झाला आहे’.
Amruta Khanvilkar in Waves Summit 2025
नरेंद्र मोदी यांचाही व्हिडिओ अमृता खानविलकर ने शेअर केला, त्यात तिने लिहिले, “महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! एक मे हा केवळ एका राज्याच्या निर्मितीचा दिवस नाही, तर तो आपल्या एकतेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्या मातीतल्या संस्कृतीचा, परंपरेचा, आणि शौर्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.
पुढे ती म्हणते की या कार्यक्रमात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी देशाच्या भविष्या संदर्भातील आपले विचाराने दृष्टिकोन व्यक्त केले. ही केवळ एक सभा नव्हती, तर एक ऊर्जेने भरलेला अनुभव होता — जिथे नव्या भारताचे स्वप्न, तरुणाईचा उत्साह, आणि तंत्रज्ञानाची दिशा एकत्र आली होती. असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
पुढे ती म्हणते Waves सारख्या कार्यक्रमातून देशातील तरुण पिढीला प्रेरणा देणं, त्यांचं मनोबल वाढवणं आणि त्यांना देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेणे हेच या भेटी मागचं प्रमुख उद्दिष्ट होतं. उपस्थित त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ही संधी नव्या कल्पनांना, नव्या ऊर्जा निर्माण करणारे एक व्यासपीठ ठरली.
हे खरंच ‘नवा भारत’ घडवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल होतं. Ps – त्याचबरोबर थलायबार रजनीकांत यांच्या दर्शनाचाही योग आला! जय महाराष्ट्र! असे तिने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Waves परिषद आजच नव्हे तर एक ते चार मे पर्यंत आयोजित आहे.