मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी पोलिस अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आला.
Mumbai : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ त्याचबरोबर ताजमहल हॉटेल ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी नुकतेच पोलिसांना मिळालेली आहे. मुंबई एअरपोर्ट पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आला आहे. ई-मेल मध्ये आतंकवाद्यांनी मुंबई विमानतळ आणि ताजमहल हॉटेल बॉम्बे उडवण्याची धमकी दिलेली आहे. दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कु शंकर यांच्या फाशीचा बदला घेणारच असं या ई-मेलमध्ये सांगितलेला आहे. या ई-मेलची मुंबई पोलिसांनी योग्य प्रकारे तात्काळ दखल घेतलेली आहे. आणि तपासालाही सुरुवात केलेली आहे. हॉटेल ताजमहल आणि मुंबई विमानतळ या दोन्हीही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. तपासादरम्यान काहीही संशयास्पद सापडलेले नाही.
ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्ब ने उडवण्याची धमकी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा ई-मेल पाठवण्यात आला. त्यासह एअरपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांनाही हा मेल आला. त्यावेळी महेश कदम हे ड्युटीवर होते. या ईमेलमध्ये एकूण सात आरडीएक्स बॉम्ब ताजमहल हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट परिसरात ठेवण्यात आल्याचे सांगितले होते.
हा ईमेल पोहोचतात पोलीस शिपाई कदम यांनी लगेच वरिष्ठ अधिकारी वहटकर यांना माहिती कळवली. त्यानंतर बॉम्ब निरोगी पथकाने एअरपोर्ट टर्मिनल एक, दोन, प्रवेश गेट, टॅक्सी स्टँड समोर हॉटेल बाजू सांताक्रुज आणि एटीसी टॉवरची तपासणी करून घेतली.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने आज सकाळी मुंबई एअरपोर्टवर दोन खरार असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडले होते. हे दोन्ही दहशतवादी पुण्यात आयएसआय (ISIS) चे स्लीपर होते. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तला खान असं पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींना एअरपोर्टच्या टर्मिनल वर दोन वरून योजना रचत पकडले गेले. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनंतर यांना पकडणे सोपे झाले. सगळ्यात आधी या दोघांच्या सामानाची तपासणी योग्य रीत्या करण्यात आली. त्यानंतर या या दोघांच्या सामानाला जप्त करण्यात आले. हे दोघे इंडोनेशियातून जकार्ता मग तिथून भारतात आलेले होते. सुरक्षा यंत्रणेला भूल पाडून ते एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघे गेल्या दोन वर्षापासून फरार होते. या दोघांवर बक्षीसही ठेवले होते. या दोघांना जो कोणीही पडेल त्याला तीन लाख देण्यात येणार होते.
त्यामध्ये 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहेलगांमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सर्व देशांमध्ये नागरिक संतापलेले होते. दहशतवाद्याविरुद्ध प्रत्येकाच्या मनामध्ये रागाचे वातावरण निर्माण झाली होते. या आल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली. आणि पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे अनेक उध्वस्त करून टाकले. ऑपरेशन सिंदूर ही राबवण्यात आले होते. त्यामुळे आतंकवाद्यांनी धमकीचे ईमेल देण्याची ठरविले असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवाद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाही केली जात आहे, आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.