शुक्रवारी उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाने 'लँड अँड गो' या सरावास सुरुवात केलेली आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर येथील पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि काही पर्यटक जखमी झाले होते. निष्पाप नागरिकांवर हल्ला करून त्यांना दहशतवाद्यांनी मृत्यूमुखी पाडले होते. त्यामुळे अशा क्रूर कृत्यामुळे भारताने पाकिस्तान मध्ये जाणारी सिंधू नदी चे पाणी अडविले, आणि सिंधू करार मोडला. आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
शाहजहानपूर : दहशतवाद्यांना शिक्षण देणाऱ्या, आणि जास्तीत जास्त प्रमाणात दहशतवादी निर्माण करणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्यासाठी, भारतीय लढाऊ विमानांना आत्तापासूनच तयार करण्यात येत आहे. पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस–वेवरूनही लढाऊ विमाने जे पाहू शकणार आहेत. त्यासाठीचे प्रात्यक्षिक शुक्रवारी यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. त्यामुळेच पाक अत्यंत घाबरलेले आहे.
‘लँड अँड गो’ सराव :
उत्तर प्रदेशातील शहाजानपूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाने शुक्रवारी ‘लँड अँड गो’ या सरावास सुरुवात केलेली आहे. 3.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ही ड्रिल झालेली आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण सज्जते मध्ये एक महत्त्वाचा टप्पा काढण्यात आला आहे.
भारतातील ही एक पहिली अशी एअर स्ट्रीप आहे जेथे रात्री आणि दिवसाही लढाऊ विमानाचे लँडिंग होऊ शकते. याआधी पण एक्सप्रेसवेवर आपातकालीन सराव करण्यात आली होते. लखनऊ–आग्रा व पूर्वाचल येथे एक्सप्रेसवेवर आपातकालीन सराव करण्यात आली होते. आणि हे फक्त दिवसा मर्यादित होते. पण उत्तर प्रदेशातील शहाजानपूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर दिवसा आणि रात्री पण सराव केली जात आहेत.
हे वाचा —Pahalgam terror attack ; पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहा लाख सायबर हल्ले
कोणकोणत्या विमानांच्या चाचण्या झाल्या?
चाचण्या झालेल्या विमानांची पुढील प्रमाणे यादी आहे : राफेल, मिग-29, एएसयु – 30 एमकेआय, मिराज–2000, जग्वार, एएन – 32 व एमआय – 17 व्ही पाच हेलिकॉप्टर, सी-130 जे सुपर हर्क्युलस, या काही लढाऊ विमानांचा समावेश आहे. चांगल्या प्रकारची आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून, दिवसाच्या वेळी बारापेक्षाही अधिक लढाऊ विमानांचे उड्डाण व लँडिंग झाले. आणि यामध्ये रात्री पण सराव घेण्यात येत आहे, तर रात्रीच्या सरावासाठी संध्याकाळी सात ते रात्री 10 पर्यंत जालालाबाद ते मदनपूर दरम्यानचा बरेली–इटावा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे.
लढाऊ विमानांसाठी चौथा एक्सप्रेस–वे
गंगा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर, तो आपातकालीन धावपट्टी असलेला उत्तर प्रदेशातील चौथा एक्सप्रेसवे ठरेल. पण जेथे रात्री उडान केले जाईल किंवा रात्रीचे उडान शक्य होईल असा पहिलाच एक्सप्रेसवे असेल. त्यामुळेच सतत 24×7 ऑपरेशनल तयारी शक्य होईल एक्सप्रेसवे मेरठ ते प्रयागराज दरम्यान बांधण्यात येत असून 594 किलोमीटर लांबीचा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 36,230 कोटी रुपये इतका आहे.