रस प्यायला ये म्हणलं माय : सचिन कुमावत आणि मोगरा पवार यांचा Adorable व्हिडिओ सॉंग

आपल्या सर्वांचे लाडके सचिन कुमावत हे नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. त्या गाण्याचं नाव ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ असं आहे. मोगरा पवार यांच्यासोबत मिळून त्यांनी हे गाणं प्रेक्षकांसमोर आणल आहे. मोगरा पवार यांचा रस प्यायला ये म्हणलं माय हा डायलॉग इंस्टाग्राम वर वायरल झाला होता. त्या वायरल डायलॉग ला घेऊन सचिन कुमावत यांनी प्रेक्षकांसाठी एक गाणं बनवून टाकल. त्या गाण्याचे नाव रस प्यायला ये म्हणलं माय कसा आहे.

Marathi singer Sachin Kumawat :

सचिन कुमावत हे शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश उत्तर महाराष्ट्र इथले आहेत. खानदेशी सुपरस्टार आहेत. खानदेशात यांचे गाणे खूप ऐकले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रात यांचे गाणे सुप्रसिद्ध आहेत. आणि हे अहिराणी, मराठी भाषेतील प्रसिद्ध गायक आहेत. त्याचबरोबर सचिन कुमावत अभिनय ही करतात.

सचिन कुमावत यांचे अनेक सुप्रसिद्ध गाणे आहेत. त्यापैकी सावन महिना म, फुगे घ्या फुगे हे सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहेत. त्यांचे गाणे प्रेक्षक आवडीने ऐकतात. “आता रस प्यायला ये म्हणलं माय”, हे गाणं प्रसिद्ध होत आहे. आणि प्रेक्षकांना हे गाणं आवडतही आहे.

Mogra Pawar :

मोगरा पवार हे इन्स्टास्टार आहेत. इंस्टाग्राम वर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. त्यातला ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ या डायलॉग चा व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला होता. या डायलॉगवर अनेक रील स्टार ने व्हिडिओज बनवले आहेत. पण सचिन कुमावत यांनी या डायलॉगवर चक्क व्हिडिओच बनवून टाकला. हे गाणं प्रेक्षकांना आवडतही आहे. आणि वायरलही होत आहे.

गाण्याबद्दल :

डायरेक्टर आणि डीओपी : रुपेश पाईकराव. यांनी केलेली आहे. आणि कोरिओग्राफी (choreography) समाधान निकम (Samadhan Nikam) आणि रांचो बीरूड (rancho bhirud) यानी केलेली आहे. या गाण्याला रुपेश पाईकराव यांनी एडिट केलं आहे. डिजिटल पार्टनर अँड डिस्ट्रीब्यूटर (digital partner and distributor) अल्पेश कुमावत (Alpesh Kumawat). या गाण्याचे पोस्टर प्रसाद बागळ (Prasad Bagal) यांनी बनवल आहे. या गाण्यांमध्ये सचिन कुमावत आणि मोगरा पवार यांनी अभिनय केला आहे. आणि सिंगर सचिन कुमावत हेच आहेत.

‘रस प्यायला ये म्हणलं माय’ ह्या गाण्याचे बोल पुढील प्रमाणे आहेत.

जाणुडीचा मनावर लय जीव हाय
ऊनताणमा माले घेऊन जाय जाणुडीचा मनावर लय जीव हाय
ऊनताणमा माले घेऊन जाय
मनी मोगरा माले काय म्हणस व माय
रस प्यायला ये म्हणल माय
पोरा रस प्यायला ये म्हणल माय रस प्यायला ये म्हणल माय
पोरा रस प्यायला ये म्हणल माय

इन्स्टावर व्हायरल मनी मोगरा सुंदर
केसांच्या लटा तीन्या उडत्या भुरभुर इन्स्टावर व्हायरल मनी मोगरा सुंदर
केसांच्या लटा तीन्या उडत्या भुरभुर
गाडीवर मना ती फिरत जाय गाडीवर मना ती फिरत जाय
उणमा जीवनी व्हस लाय लाय उणमा जीवनी व्हस लाय लाय मनी मोगरा माले काय म्हणस व माय
रस प्यायला ये म्हणल माय

हाटलित खावाणी तिले भलती चटक
पाणी पुरी खावाले तिले लईच आवडस हाटलित खावाणी तिले भलती चटक
पाणी पुरी खावाले तिले लईच आवडस
नखरा तिना लय हायफाय
देखण रूप सुंदर हाय नखरा नखरा तिना लय हायफाय
देखण रूप सुंदर हाय रस प्यायला ये म्हणल माय

रोज चाले असा हा खेळ वाट पाहे ती रसवंती
माले भेटासाठे तरसे मनी मोगरा लाजवंती रोज चाले असा हा खेळ वाट पाहे ती रसवंती
माले भेटासाठे तरसे मनी मोगरा लाजवंती
पावडर लाली लावस काय
नटीवानी काय दिखस बाय पावडर लाली लावस काय
नटीवानी काय दिखस बाय

मनी मोगरा माले काय म्हणस व माय
रस प्यायला ये म्हणल माय रस प्यायला ये म्हणल माय रस प्यायला ये म्हणल माय

सध्या हे गाणं youtube आणि इंस्टाग्राम वर खूप वायरल होताना दिसत आहे.

सचिन कुमावत यांचे अनेक व्हिडिओ सॉंग्स आपल्याला युट्युब ला पाहायला मिळतात. ‘सावन महिना म’ हे सचिन कुमावत यांचे अतिशय प्रसिद्ध गाणं आहे. युट्युब ला या गाण्यावर मिलियम्स मध्ये view आहेत. सावन महिना म या गाण्यावर दहा करोड इतके views आहेत. सर फुगे घ्या फुगे ह्या गाण्यावर तब्बल 29 करोड इतके युट्युब views आहेत. रस प्यायला ये म्हणलं माय हे गाणं दोन दिवसा खाली त्यांनी यूट्यूब चैनल वर टाकलेला आहे. या गाण्याला दोन दिवसांमध्येच 6.4 लाख इतके व्ह्यूज आहेत.

रस्त्याला ये म्हणलं माय या गाण्यावर प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment