Big News: राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची करणार मदत

Maharashtra government: पहलगाम हल्ल्यानंतर पहलगाम टेरर अटॅक कुटुंबीयांना मदत म्हणून 50 लाख आणि सरकारी नोकरी बाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं.

पहलगाम टेरर अटॅक:

पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारने आर्थिक मदत देण्याचे ठरविले होते. या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले होते. त्या कारणामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पीडित कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याचे ठरविले आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू काश्मीर येथील पहेलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांना मृत्युमुखी पाडले. या हल्ल्याने देशातील नागरिक संतापले आहेत. पहेलगाम मध्ये आतंकवादी हल्ल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सहानुभूती व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना भेटून त्यांना आधार दिला. आणि त्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारी नोकरी बाबतचा आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं.

महाराष्ट्रातील मृतांची नावे

एक अतुल मोनी — डोंबिवली
संजय लेले — डोंबिवली
हेमंत जोशी — डोंबिवली
संतोष जगदाळे — पुणे
कौस्तुभ गणबोटे — पुणे
दिलीप देसले — पनवेल

मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 50 लाख आणि पीडित कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पीडित नागरिकांना ही एक मदत असणार आहे. त्याचबरोबर, शिक्षण आणि रोजगारात अडचण येऊ नये, याची खात्री करण्यात आली आहे. आणि त्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यात आली आहेत.

या हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचाही मृत्यू आहे. जम्मू काश्मीर मध्ये पहेलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी संतोष जगदाळे यांना त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्या गोष्टीचा मोठा धक्का त्यांच्या परिवाराला बसलेला आहे. संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला एक आधार मिळेल.

Leave a Comment