Karnataka crime : कर्नाटका तब्बल 17 किलो सोन्याची चोरी झालेली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की कर्ज न मिळाल्याने कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने बँकेतून तब्बल 17 किलो सोन्याची लूट केली होती. स्पॅनिश क्राईम ड्रामा आणि ‘मनी हेस्ट’ वेब सिरीज पाहून त्याने चोरीचा डाव आपला होता. मनी हेस्ट सिरीज पाहून त्याने सहा ते सात महिने डाव आकून मग ही चोरी केली होती.

कर्नाटक पोलिसांनी 17.7 किलो सोनं चोरणाऱ्या सहा जणांना अटक केलं. 28 ऑक्टोबर 2024 रोजी दावणगिरी जिल्ह्यातील न्यामती इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी चोरीचे दागिने तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उस्सलम पट्टी शहरातील एका विहिरीतून जप्त केले. विजयकुमार नावाच्या व्यक्तीने एसबीआय बँकेमध्ये 2023 मध्ये 15 लाखांच्या कर्जासाठी अर्ज केले होते. त्यानंतर त्याचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते त्याला बँकेमधून कर्ज न मिळाल्याने त्याने हा डाव आकून तब्बल 13 कोटी रुपयांचे सोने लुटले होते.(लुटलं 17 किलो सोनं )
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत.(लुटलं 17 किलो सोनं)
विजय कुमार – वय 30
त्याचाच भाऊ अजय कुमार – वय 28
अभिषेक – वय 23
चंद्र – वय 23
मंजुनाथ – वय 32
परमानंद – वय 30, एवढ्या व्यक्तींचा या चोरीमध्ये वाटा आहे.
ऑक्टोंबर 2024 मध्ये एसबीआय बँकेच्या शाखेच्या कर्मचाऱ्यांना एका रूम मधील लॉकर गॅस कटरने तोडल्याचे सापडलं होतं. चोरांनी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून खिडकी मधून बँकेमध्ये प्रवेश केला. बँकेची तिजोरी सोबत घेऊन गेली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला. बँकेचे डीव्हीआर काढून घेतले. आणि चोरीच्या ठिकाणी लाल मिरची टाकण्यात आली.
विजयकुमार व त्याच्या भावाने आणि त्यांच्या इतर साथीदारांनी दररोज बँकेत जाऊन तपासणी केली. चोरीचा भक्कम डाव आकला. त्यांचा साथीदार चंदू, अभिषेक, परमानंद, मंजुनाथ, हे सगळे सहा महिन्यापासून दावा करत होते. डायरेक्ट जाऊन चोरी केली तर इतर लोकांना कळेल म्हणून त्या सगळ्यांनी शेतातून जाऊन चोरी करायची ठरवली. रात्रीच्या टाईमला चोरांनी लोखंडी खिडकी तोडून आत घुसून सर्व सोने, व इतर काही गोष्टी चोरल्या.
चोरी केल्यानंतर चोरांनी हळूहळू चोरलेले दागिने सोन विकण्यास सुरुवात केली होती. सोने विकून मिळालेल्या पैशातून कुणी व्यवसाय सुरू केला, घर खरेदी केली, कुणी इतर प्रॉपर्टी खरेदी केली. गुजरात राजस्थान दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शोध घेत होते, त्यादरम्यान तमिळनाडू मधून एका व्यक्तीकडून त्यांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी चोरी केलेली सोने परत मिळवण्यासाठी धडपड केली. तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसीलमपट्टी भागात मोठी मोहीम सुरू केली. आणि तीस फूट खोल विहिरीतून लॉकर बाहेर काढले. त्यात तब्बल 15 किलो सोने होते. https://manews24.in
विहिरीत लॉकर लपवण्याची कल्पना विजय कुमारची होती. दोन वर्षानंतर कुणालाही संशय न येऊ देता ते लॉकर बाहेर काढण्याचे ठरविले होते, पण त्याआधीच पोलिसांच्या हाती ते लॉकर लागले.