सोन्याच्या 500 खाणी (gold mines) असणारा देश; तुम्हाला माहित आहे का?

सध्याच्या काळात आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. गृहीत धरा तुम्हाला कोणी जर म्हणत असेल की मी तुमचे पैसे दुप्पट करून देतो, मला एक हजार रुपये द्या, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल का? आपल्याला असे खूप लोक भेटत असतात जे असंच खोटं बोलू लोकांना लुबाडत असतात. सध्याच्या काळात हा एक ट्रेंड चालू आहे की तुम्ही मला एवढे पैसे द्या आणि मी तुम्हाला त्याची दुप्पट पैसे करून देतो. महिन्याला दहा-पंधरा टक्के व्याज टाकून देतो.

अत्यंत कमी पैशात महागड्या वस्तू घेऊन देतो. अशा लुबाडणाऱ्या लोकांची आणि नवनवीन स्किम करणाऱ्या लोकांची आपल्याकड मोठ्या प्रमाणात रांग लागलेली दिसून येते. पण एक वास्तववादी गोष्ट आहे, किंवा खरी खरी गोष्ट आहे असे हे समजू शकता. त्यात व्हीयेतनाम हा एक देश मोडतो. भारतीय चलनातील हजार रुपये व्हिएतनामी देशाच्या चलनाच्या तीन लाख ‘डोंग’ इतके आहेत. इतकं व्हिएतनामचं चलन कमजोर आहे. ही गोष्ट असली तरी या देशाला एक वारसा लाभलेला आहे तो म्हणजे या देशात मोठमोठ्या सोन्याच्या खाणी आढळून येतात.

सोन्याच्या 500 खाणी असणारा देश

पूर्वीच्या काळापासूनच हा एक देश आणि इथले लोक सोन्या नाण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहेत. या देशात एक असं हॉटेल आहे जे पूर्णतः सोन्याने बनलेला आहे. ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. पण या देशात चक्क सोन्याचा हॉटेल बनलेला आहे. जे कुणीही पाहिलेलं नसेल. सोन्याचा हॉटेल म्हणजे नवलच. आपल्याकडे सोन पहायला मिळत नाही आणि व्हिएतनाम मध्ये चक्क सोन्याचं हॉटेल आहे. किती मोठा आश्चर्य आहे बरं… व्हिएतनाम ची राजधानी हनोई येथे असलेल्या या सोन्याच्या हॉटेलचं नावही ‘गोल्डन लेक’ असंच ठेवण्यात आलेला आहे. या हॉटेलला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. एवढ्या उंच इमारतीमध्ये 400 ओल्या आहेत. हे हॉटेल 25 मजली आहे. या पंचवीस मजली हॉटेलमध्ये तब्बल 400 खोल्या आहेत.

या हॉटेलमध्ये सगळं काही सोन्याचा आहे सोन्याचे दरवाजे, सोन्याचे खिडक्या, सोन्याचे नळ, सोन्याचं बाथ टब, इतकच काय हॉटेलमध्ये शौचालय सुद्धा सोन्याचे आहेत. सिंगापूर बुलियन मार्केटच्या अहवालानुसार 2021 मध्ये आशिया खंडातील सोन्याचा सर्वात मोठा बाजार व्हिएतनाम मध्ये होता.(सोन्याच्या 500 खाणी)

या देशातील सोन्याच्या खाणी वाढतच चालले आहेत. सोन्याचा साठा दिवसेंदिवस वाढतोय. आणि या काही दिवसात तर तेथील चक्क चाळीस सोन्याचा आणि सापडले आहेत. त्यात किमान 25 ते 30 टन सोना असेल, असा अंदाज तज्ञांनी लावलेला आहे. या सोन्याच्या खाणींचा त्या देशातील लोकांना उपयोग होईल. असं राजकर्त्यांचा म्हणणं आहे.(सोन्याच्या 500 खाणी)

व्हिएतनाममध्ये जागोजागी सोन्याच्या खाणी आहेत. बाक, काम, तूयेन वांग या प्रांतात आठ, लाई चाऊ, प्रांतात पाच, थान होआ आणि नघे अन या प्रांतात चार, लाग सॉंन आणि काओ बँग येथे तीन, हा जीआंग आणि एन बाई येथे दोन, तर दिएन बीएन इथं एक… अशा सोन्याच्या अनेक मोठमोठ्या खाणी येथे सापडलेल्या आहेत.
याशिवाय दुसरीकडे पण अनेक ठिकाणी सोन्याच्या लहान अथवा मोठ्या खाणी आहेतच. त्यामुळेही व्हिएतनाम या देशाला मोठ्या प्रमाणात मदत मिळते.

अंदाजानुसार व्हिएतनाम मध्ये सोन्याच्या ज्या काही खाली आहेत, त्या सोन्याची जवळपास सोन्याच्या 500 खाणी आहेत. या सर्व खाणींमध्ये सुमारे तीनशे टन सोनं असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. नुसतं सोनच नव्हे तर मोठमोठ्या सोन्याच्या खाणीचा या देशात सापडतात. या घटनेमुळे इतर देशांची नजर इयत्ता देशावर असते. सध्या तर या देशाकडे जगाचं लक्ष लागून आहे.

प्रत्येक देशामध्ये सोन्याच्या आणि आहेत. पण व्हिएतनाम मध्ये सोन्याच्या 500 खाणी आहेत. प्रत्येक खाणीमध्ये सोनं आहे. एवढ्या सोन्यामध्ये कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. एवढी सोने असूनही त्या देशाचे खूपच कमजोर आहे. पण या देशाला सोन्याचा वारसा लाभलेला आहे.

व्हिएतनाम मध्ये जास्त तर सोन्याचा खाणी उत्तरेकडील डोंगराळ भागात आढळून येतात. उरलेल्या काही खाणी मध्य प्रांतात आहेत. व्हिएतनामी लोकांचं म्हणणं आहे की आमच्या देशातच चलन खूपच कमजोर आहे, ज्यामुळे मोठा फटका या देशाला बसतो. पण या देशात भरपूर सोन्याच्या खाणी आहेत ज्यामुळे या देशाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही. सोन्याच्या मोठमोठ्या सोन्याच्या 500 खाणी या देशात आहेत. इतकेच नव्हे तर सोन्याचं हॉटेलही या देशात आहे.

Leave a Comment