Maharashtra weather : (माथेरान महाबळेश्वर) राज्यात मागील 48 तासापासून काही भागांमध्ये तापमान वाढ होत असताना काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वादळी पाऊस अशा परिस्थितीमुळे राज्यातील जास्त तर जिल्ह्यांमध्ये तापमानातील उतार चढ पाहिला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाला पुढील 24 तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा करण्यात आला आहे. अवकाळी पावसाबरोबरच विजा पण चमकतील. असं हवामान विभागाने सांगितलेला आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
विदर्भ आणि मराठवाडा तील या या स्थितीमुळे दुसऱ्या भागावर मोठा परिणाम होणार आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे. त्याचदरम्यान राज्याच्या गिरीश स्थानांनाही वाढतच चाललेल्या उष्णतेचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळेच हिल स्टेशन ‘हिट’ स्टेशन होताना दिसून येत आहे. कारण उष्णता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. थंड हवेचे ठिकाणे पण जास्त उष्णता वाढत आहे. त्यामुळेच हिल स्टेशनवर पण, हिट स्टेशन सारखं जाणवत आहे.(माथेरान महाबळेश्वर)
थंड हवेच्या ठिकाणी ही वाढली उष्णता (माथेरान महाबळेश्वर)
एकीकडे उन्हाचा होरपळा वाढत असताना अनेकांचे पाय गिरीश स्थानांकडे वळतात. पण या उन्हाळ्यात असे काही घडेल याची शक्यता नाही. कारण हा निर्णय यंदाच्या उकाड्यात खूप महागात पडू शकतो. राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशा थंड हवेच्या भागावर उष्णता वाढल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे हे थंड हवेचे ठिकाण गरम हवेचे ठिकाण बनलेली आहे. लोणावळ्यात सुद्धा 38 डिग्री सेल्सिअस असे तापमान आहे. त्याचबरोबर तोरणमाळ आणि इगतपुरी इथं तापमान 29 डिग्री सेल्सिअस असे आहे. त्यामुळे येथे जास्त उष्णता वाढलेली आहे. आणि थंड हवेचे ठिकाण हे गरम ठिकाण बनलेले दिसून येत आहेत. त्यामुळेच ही ठिकाणं फारसा दिलासा देताना दिसत नाहीत.(माथेरान महाबळेश्वर)
सध्या तर देशा मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू पासून अगदी मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आणि मध्य प्रदेशात सोबतच समुद्रसपाटीपासून जवळच्या भागांमध्ये साधारण 900 मिटर उंचावरून चक्राकार वारे वाहत असताना दिसून येत आहे. ज्यामुळे वातावरणात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ावसाची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.