Heat Alert : भारतात नव्हे तर जगात ठरले चंद्रपूर शहर सर्वात उष्ण; एप्रिलमध्ये पारा 45.6 अंश

नागपूर/चंद्रपूर : आश्चर्य वाटण्या इतकी वेळ चंद्रपूर वर आलेली आहे, कारण चंद्रपूर हे देशातच नाही तर संपूर्ण जगात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी या शहराचा पारा 45.6° वर पोहोचला होता. रविवारी पण देशात नागपूर/चंद्रपूर पहिलेच होते. आता पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची भक्कम लाट येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे.

सूर्य तापल्यासारखा वाटतो विदर्भात सूर्याने त्याची भट्टी पेटवल्यासारखी स्थिती निर्माण केलेली आहे, कारण संपूर्ण जगातील उष्ण शहरांच्या लिस्टमध्ये चार शहरे विदर्भातील आहेत. चंद्रपूर या शहरानंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी हे शहर आहे. ब्रह्मपुरी या शहरात सोमवारी 45 अंश तापमान होते. तर या यादीमध्ये अमरावती पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. त्या यादीमध्ये अकोला जिल्हा 12 व्या क्रमांकावर आहे. 44.1° असा अकोल्याचा तापमान आहे.

Heat Alert : जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीमध्ये 15 पैकी 11 शहरे भारतातीलच

उष्णतेच्याजगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीमध्ये 15 पैकी 11 शहरे भारतातीलच यादीमध्ये संपूर्ण जगभरात भारताचा पहिला क्रमांक आहे. कारण सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये 11 शहरे ही एकट्या भारताचे आहेत. विदर्भातील चार शहरांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावरील झारसुगुडा येथे 45.4 अंश तापमान नोंदविण्यात आले. सहाव्या क्रमांकावर सिंधी आहे. आणि त्याचे तापमान 44.6° असे आहे. सातव्या क्रमांकावर राज नांदगाव आहे, त्याचे तापमान ४४.५ अंश आहे. नव्या क्रमांकावर प्रयागराज व भरपूर आहे, त्याचे तापमान ४४.३ अंश आहे. अकराव्या क्रमांकावर खजुराहो आहे, तापमान 44.2 अंश आहे. चौदाव्या क्रमांकावर आदिलाबाद आहे, त्याचे तापमान 43.4 अंश आहे. आणि पंधराव्या क्रमांकावर रायपूर 43.7 अंश आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह विदर्भाला उष्णतेच्या लाठीचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेचा पारा 42 किंवा त्यापेक्षा अधिक नोंदविला जाऊ शकतो.

उष्णते मध्ये काय काळजी घ्याल?

या वाढत्या उन्हामध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घेऊ शकता. हे पुढे सांगितलेले आहे. सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घेतल्याने उष्णतेपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.
पाणी जास्त प्रमाणात प्या, लिंबू पाणी प्या, नारळपाणी प्या. उन्हामध्ये टोपी घालूनच बाहेर पडा किंवा कानाला रुमाल बांधून बाहेर पडा.
सकाळी 11 ते दुपारी चार या वेळात बाहेर जाणे शक्यतो टाळा.

Leave a Comment