Money laundering ; मनी लॉन्ड्रींग केस मध्ये फसला (hero) महेश बाबू, ED ने पाठवला नोटीस

साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा प्रोजेक्ट च्या धोकाधडी च्या मामल्यामध्ये साउथ सुपरस्टार महेश बाबू यांची परेशानी वाढत चाललेली आहे. काही दिवसा खाली ऍक्टर साठी ED कडून समन जारी करण्यात आला आहे. या संबंध मध्ये त्यांना 28 एप्रिल ला हजर होण्याची नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

रियल स्टेट फर्म शी जूडलेल्या गोष्टींशी चालू असलेल्या पडताळणी मध्ये साउथ चे सुपरस्टार महेश बाबू यांना नोटीस देण्यात आली. ॲक्टर साई सूर्य डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या दोन रिअल स्टेट फर्म्सच्या फसवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. ज्यांच्यावर अनधिकृत जागा विकून एकाच जाग्याची अनेक पक्षांना किंवा अनेक लोकांना पुनर्विक्री करून आणि बनावटी , खोटी नोंदणी हमी देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडिया मधील एका वृत्तानुसार, महेश बाबू यांच्यावर या दोन विकासकांनी प्रमोट केलेल्या प्रकल्पांना पाठिंबा दिल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे, यामध्ये महेश बाबू यांचा कसा संबंध असेल समोर जाणून घेऊया.

मीडियाच्या रिपोर्टनुसार, ॲक्टर ला त्याच्या जाहिरातींसाठी 5.9 कोटी रुपये मिळाले, त्यामधून 3.4 कोटी रुपये चेक द्वारे आणि उरलेली 2.5 कोटी रुपये कॅशच्या स्वरूपात देण्यात आल्याचे वृत्त आहे. हा व्यवहार आता ईडीच्या चौकशीच्या कक्षेत आला आहे.

मनी लॉन्ड्री हा एक आर्थिक गुन्हा आहे. मनी लॉन्ड्रींग याचा अर्थ असा आहे की बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे कायदेशीरपणे दाखवून देणे. सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगायचे म्हणले तर, काळा पैसा पांढरा दाखवणे असे होय. त्यामध्ये, आरोपी बेकायदेशीर (भ्रष्टाचार, कर चोरी, दहशतवादी) मार्गाने कमावलेला काळा पैसा पांढरा दाखवण्याचा प्रयत्न करते.

महेश बाबू यांच्यावरचे आरोप कोणते आहेत? (Money laundering)

अहवालात असे म्हटले आहे की, “या ग्रह निर्माण प्रकल्पांना महेश बाबु नी दिलेल्या समर्थन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आणि खरेदीदारांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका आहे, असे मानले जाते”. तेलंगाना पोलिसांनी त्यांच्या चौकशीमध्ये असे सांगितले आहे की अनधिकृत आणि बेकायदेशीर मार्गानी खरेदीदारांची फसवणूक केलेली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ॲक्टर वर एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे. पण महेश बाबू घोटाळ्याच्या ऑपरेशनशी संबंधित असल्याचा किंवा या घोटाळ्यात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

Leave a Comment