नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी केले. आणि 1960 चा सिंधू पाणी करा रद्द केला.

pahalgam terror atack: मंगळवारी पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. त्या हल्ल्यात 26 पर्यटक जागीच मृत्युमुखी पडले. त्यामुळे, भारताने त्यावर मोठी कारवाई केली. त्यामध्ये 1960 चा सिंधू नदीचा पाणी करा मोडला आहे. सिंधू करार मोडल्यामुळे पाकिस्तान अधिकच टेन्शनमध्ये आले आहे. आता पाकिस्तानही भारताच्या विरोधात कारवाई करण्याच्या तयारीतच आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.
भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध मोठे निर्णय घेतलेले आहेत. पाच मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. त्यातला एक आहे सिंधू पाणी करार. भारताने सिंधू पाणी करार मोडला आहे आणि त्याचबरोबर अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात आलेला आहे.
आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या निर्णयावर टीका केली आहे. एका न्युज रिपोर्टरशी बोलताना ईशादार म्हणाले की, भारताने दहशतवादी संघटनाबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. भारत रागाच्या भरात हे निर्णय घेत आहे. ‘कोणत्याही घटनेचे पुरावे न देता भारताने हे निर्णय घेतलेले आहेत’ आणि दहशतवादी घटनाबाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले की, कधीही भारतावर कोणतेही संकट आले तरीही भारत पाकिस्तानलाच जबाबदार धरते. भारताच्या घोषणानंतर, पाकिस्तान एन एस सी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती यांनी सांगितली.
भारताने जे काही पाकिस्तान बद्दल बोलले आहे ते सर्व अयोग्य आहे असे शब्द म्हणत होते. आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून त्याचे उत्तर दिले जाईल. आणि दहशतवादावर कशाप्रकारे राग दाखवणे किंवा व्यक्त करणे योग्य नाही, असे इशाक दार म्हणाले होते.
भारताने हे निर्णय घेतले :(सिंधू पाणी करार)
भारताने पाकिस्तान सोबत करण्यात आलेला सिंधू पाणी करार सरकारने तात्पुरता थांबवला आहे. अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्या लोकांनी आधीच वेध कागदपत्रांसोबत या मार्गाने भारतात प्रवेश केला आहे त्यांनी एक मे 2025 पर्यंत त्याच मार्गाने परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
देश सोडून जाण्याचे आदेश
भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क विजा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व एस व्ही इ एस (SVES) पिझ्झा आता अवैध मानले भारतातील आणि या विजाखाली भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी लोकांना, नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामुळे या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यात आला आहे.