Indore doctor refuses to treat Muslim patient : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, इंदूर येथील एका डॉक्टरने, मुस्लिम पेशंट वर उपचार करणार नाही असे सांगितले. आणि उपचार करण्यास सरळ नकार दिला.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केल्याचे समोर आले आहे.
इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट झाली वायरल (पहलगाम)
अनेक पर्यटकांनी त्यात आपला जीव गमावला. या घटनेनंतर संपूर्ण देशात नागरिक संतापले होते. आणि जिकडे तिकडे संतापाची लाट उसळली आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका डॉक्टरने त्याच्या व्हाट्सअप चॅट ची स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर टाकली आहे. स्क्रीन शॉट सोशल मीडियावर वायरल होताना दिसून येत आहे. त्यात डॉक्टर डॉक्टर म्हणतो मी मुस्लिम रुग्णावर उपचार करणार नाही. आणि सरळ समोर उपचार करण्यास नकार दिला आहे.
स्क्रीन शॉट डॉक्टर नेहा अरोरा वर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या स्क्रीन शॉट मध्ये इंदूर येथील एका डॉक्टरने मुस्लिम रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला आहे. ही रुग्ण मुस्लिम महिला असल्याची समोर आले आहे. ती महिला गुडघ्यावर उपचार घेत होती.
डॉक्टरने गुडघ्यावर उपचार घेत असलेल्या मुस्लिम महिलेला उपचार देण्यास नकार दिला आहे. स्क्रीन शॉट मध्ये असे दिसून येत आहे, डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की, आम्ही आता यानंतर कोणत्याही मुस्लिम रुग्णावर उपचार करणार नाही. कृपया तुमच्या गावातील किंवा परिसरातील चांगल्या डॉक्टरांकडून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या स्क्रीन शॉट वर लोक संतापली आहेत आणि ते म्हणत आहेत की हा डॉक्टर रुग्णाच्या धर्माला लक्ष करत आहे. संतापलेल्या लोकांना पाहून डॉक्टर नेहा यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे. पण, हा स्क्रीन शॉट खूपच वायरल झालेला आहे.
या स्क्रीन शॉट बद्दल एका व्यक्तीने असे म्हटले आहे की, त्या डॉक्टरला डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देऊ नये. त्या डॉक्टरचा परवाना रद्द करण्यात यावा. त्यावर दुसरी कमेंट अशी होती की डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केलेच पाहिजेत, मग त्याचा धर्म काहीही असो. डॉक्टर कोणत्याही धर्मातील रुग्णाला नकार देऊ शकत नाही. याची डॉक्टरांना जाण असावी. काही जण म्हणत आहेत की आपण भेदभावाला दूर करून एकमेकांसोबत चांगले राहिले पाहिजे. अशा घटनांमुळे वैद्यकीय नीतिमत्ता आणि धार्मिक भेदभावाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये धार्मिक वाद वाढत चालल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य अधिकारी किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी आपले मत मांडले नाही. याबाबत समोर येऊन कोणीही बोललेले नाही.(पहलगाम)