Mumbai crime : पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे पोलिसाच्या मुलांना संपवला आयुष्य

Mumbai crime : संपूर्ण राज्यामध्ये वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्रासाला कंटाळून तिनेही आत्महत्या केल्याचे समोर आले. पण आता मुंबईतून अतिशय खळबळ जनक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील अतिशय गजबजलेल्या अशा चुनाभट्टी भागात पाहत असणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलांन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या खाजगी जीवनाच्या काही अडचणीमुळे त्यानं हा टोकाचा निर्णय घेतला असं त्याच्या कुटुंबीयाचं म्हणणं आहे. आणि त्याने टोकाचा पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्काही बसलेला आहे.

एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने पत्नीच्या विवाहबाह्य संबंध तसेच तिच्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेतली. आणि स्वतःचे आयुष्य संपवून टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलांन मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये त्याने असे सांगितले होते की, त्याच्या पत्नीच्या extra marital affair असल्याने तो आत्महत्या करत आहे. इतकेच नव्हे तर पत्नी आणि पत्नीचा प्रियकर दोघे मिळून त्याला त्रास देत असल्याचेही त्याने व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून मी आत्महत्या करत आहे असं त्याने व्हिडिओमध्ये सांगितला आहे.

या घटनेची सूचना मिळताच चुनाभट्टी येथील पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नी आणि तिच्या प्रिय कराविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. आणि त्याबद्दल तपासही सुरू केला आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा सिद्धेश आणि मानसी यांचा 2020 मध्ये विवाह झाला होता. सिद्धेश आणि मानसीचे लव मॅरेज झाले होते. लव मॅरेज असताना सुद्धा ती मित्रांसोबत चॅटिंग करत असल्याने लग्नानंतर काही दिवसातच या दोघांमध्ये भांडण होऊ लागली. आणि या भांडणामुळेच विषय अगदी टोकाला पोहोचलेला होता. त्यामुळेच सिद्धेशने 18 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. (Mumbai crime )

सिद्धेश च्या यातना मोबाईलद्वारे समोर आल्या

सिद्धेश च्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा, सून आणि मुली सोबत चुनाभट्टीतील निवासस्थानी राहत होता. त्यांचा मुलगा सिद्धेश याने 18 एप्रिल रोजी राहत असणाऱ्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर यवतमाळ येथे त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर ज्यावेळी हे कुटुंब चुनाभट्टीतील घरी पोहोचलं आणि सिद्धेश च्या आत्महतेशी संबंधित पुरावे शोधत असताना. त्याच्या संबंधित हा शेवटचा पुरावा होता. हा शेवटचा पुरावा समोर येताच खळबळ उडाली.

आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी किंवा टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सिद्धेशना लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठी मध्ये त्याने पत्नीकडून आपला मानसिक छळ होत असल्याचं त्यानं लिहिलं होतं. इतकेच नव्हे तर त्याच्या मोबाईल फोन मध्ये आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ बनविला. आणि तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आला. त्यामध्ये सिद्धेश्वर वडिलांना उद्देशून काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या.
त्यामध्ये तो असे म्हणत होता की ‘पप्पा, माझी पत्नी मानसी रत्ने आणि तिचा मित्र युवराज जाधव यांना सोडू नका. माझ्या मुलीचा ताबा फक्त माझ्या आई-वडिलांकडे द्या, आई आणि तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या…’, असं लिहत तो पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा सिद्धेशन केला. चुनाभट्टी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास जारी आहे.

Leave a Comment