अलिबाग : सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेली 15 सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षापासून बंद आहेत. रायगड किल्ल्यावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आली होते. पण 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंदच असल्याचे दिसून आलेले आहे. 12 एप्रिल ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अमित शहा रायगड किल्ल्यावर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड. रायगडाला दररोज शेकडो शिवभक्त, पर्यटक भेट देत असतात. त्या किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम होतात. 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला. तेव्हा गडावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आलेली आहे.
12 एप्रिल रोजी 365 वी पुण्यतिथी (रायगड)
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 12 एप्रिल रोजी 365 वी पुण्यतिथी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षे कडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे पालन करणे प्रशासन, शासनाचे कर्तव्य आहे.