Sharad Pawar operation sindoor : जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारतीय लष्कराने प्रहार केला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे.
ऑपरेशन सिंदूर शरद पवार :
पाकिस्तानने पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उत्तर म्हणून आज भारतीय लष्कराने पाकिस्तानी अड्ड्यांवर जोरदार हल्ला केला आहे. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लष्कराने उध्वस्त केलं आहे. भारतीय लष्कराने मध्यरात्री यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर पूर्ण केलं आहे. भारताने पाकिस्तानला दिलेल्या या उत्तराबद्दल शरद पवारांनी अभिनंदन केला आहे. शरद पवारांनी एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी लष्कराने केलेल्या कारवाईचे कौतुक करताना दिसत आहेत.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) :
शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईवर ते भारत लष्कराची ते अभिनंदन आणि अभिमान व्यक्त करताना दिसत आहेत.
शरद पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एयर स्ट्राइक करून, बेलगाम मधून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यावर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सर्व बहुमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित असणाऱ्या तसेच तहेलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन! जय हिंद!” अशी पोस्ट शरद पवार यांनी शेअर केलेली आहे.
मध्यरात्री सुरू केलं ऑपरेशन सिंदूर(operation sindoor) :
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई मंगळवारी मध्यरात्री केली. एकूण नऊ दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. भारताच्या ऑपरेशन सिंदूर चे व्हिडिओ आणि कारवाईनंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात दहशतवादी अड्डे किंवा दहशतवाद्यांची ठिकाणी पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.