Weather Alert महाराष्ट्रात दोन दिवसात अवकाळी पाऊस सुरू होणार; अनेक ठिकाणी गारपीठाची शक्यता

Weather alert : पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा मिळवला आहे. आणि राजस्थानच्या पश्चिमे पासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Pune : मध्य महाराष्ट्रात सोबतच मराठवाड्यात तापमानाचा पारा 1 ते 2 डिग्री सेल्सिअस उतरला आहे. पण, विदर्भात उष्णता कायमच आहे. पुढील 1 ते 2 दिवसात अवकाळी पावसासाठी योग्य असे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाजा दिला आहे. (Thunderstorms)
त्यानंतर, 42.4 असे तापमान अकोला येथे नोंदविले गेले आहे. आणि, अहिल्यानगर, नाशिक व जळगाव जिल्ह्यात 13 एप्रिल रविवारी अवकाळी पावसासोबतच गारपीट पण झाली.

बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. पण, राजस्थानच्या पश्चिमे पासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उन्हामुळे व जास्तीच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढले आहे, आणि बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला खूपच वेग आलेला आहे. त्यामुळेच काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा व गारपिटेचा अंदाज लावण्यात आलेला आहे.
सांगली, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, सातारा, इत्यादी भागात कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरलेला दिसून आलेला आहे. सोलापूर 40 डिग्री सेल्सिअस च्या पुढेच आहे. पुढील एक-दोन दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना बीड, सोलापूर सांगली, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर या सर्व भागांमध्ये पावसाचा अंदाज लावण्यात आलेला आहे.

मका कसा गेला वाहून (Weather Alert)

जळगाव जिल्ह्यात रावेर नंतर चोपडा तालुक्यात 13 एप्रिल रविवारी दुपारी दोन-तीन वाजता ढगांच्या गडगटासोबतच मोठा पाऊस झाला, आणि इतर काही ठिकाणी गाराही पडल्याचे दिसून आले. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हरभरा, केळी, गहू इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोठ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका पाण्यात वाहून गेला. धानोरा (तालुका चोपडा) येथे 13 एप्रिल रविवार दुपारी दीड ते दोनच्या सुमारास एक तासाच्या जवळपास पाऊस पडला. आणि अकरा ते बारा मिनिटे गारपीट झाली.
सलग गारपीट. नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दोन दिवसही गारपीट झाल्यामुळेच उन्हाळी कांदे आणि द्राक्, गहू इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर इतरही काही तालुक्यांना आणि तालुक्यातील गावांना गारपिटीचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये येवला, निफाड आणि चांदवड इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये गारपिटासह अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आलेले आहे.

गेले एक-दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या या अवकाळी पावसाने पिकांचे फार नुकसान केले आहे. मका, गहू, द्राक्ष इत्यादी पिकांचे या पावसाने मोठे नुकसान केले आहे.(Weather Alert)

अहिल्या नगर मधील अकोले तालुक्यात धामणगाव आवारी आणि परिसरात 13 एप्रिल रविवारी दुपारी एक ते दीड तास वादळ आणि अवकाळी पाऊस सुरूच होते.

Leave a Comment